जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मध्यस्थीने वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागा निश्चितीचा मुद्दा अंतिम टप्प्यात…..

0

आमदार समीर कुणावार, माजी आमदार राजू तिमांडे, राष्ट्रवादीचे अतुल वांदिले तसेच समिती सदस्यांमध्ये समन्वय साधून जिल्हाधिकाऱ्यांनी हिंगणघाटच्या जागेला प्राधान्याने विचारात घेण्याचे आश्वासन दिले.

हिंगणघाट -/ शहरातील प्रास्तावित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा जागा निश्चितीचा तिढा आता अंतिम टप्प्यात आला असून स्थानिक उपजिल्हा रुग्णालयाचे परिसरात नव्याने होत असलेल्या वैद्यकीय महाविद्यालयाचे जागा निश्चितीसाठी स्थानिक उपजिल्हा रुग्णालय परिसरातील उपलब्ध असलेल्या शासकीय जागेवर निर्माण करण्यासाठी संघर्ष समिती, स्थानिक नेते मंडळी तसेच आमदार समीर कुणावार यांचे एक मत झाले असून जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा या जागेचा प्राधान्यक्रमाने विचार करण्यात येईल असे आश्वासन आज बुधवारी आयोजित बैठकीत दिले.
यावेळी माजी आमदार प्रा. राजू तिमांडे,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सचिव अतुल वंदिले, माजी नगरपरिषद अध्यक्ष पंढरीनाथ कापसे, तसेच संघर्ष समितीचे अध्यक्ष सुनील पिंपळकर, उपोषणार्थी महिला समितीच्या पदाधिकारी म्हणून रागिनी शेंडे व पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
जिल्हाधिकारी राहुल कर्डिले आज सायंकाळी ४ वाजताचे दरम्यान स्थानिक विश्रामगृहात उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले, तहसीलदार सतीश मासाळ तसेच अधिकाऱ्यांसह उपस्थित झाले.
यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय संघर्ष समितीचे पदाधिकारी, पत्रकार तसेच शहरातील इतर गणमान्य मंडळी हजर होती.
जिल्हाधिकारी राहुल कर्डिले तसेच संघर्ष समितीचे अध्यक्ष सुनील पिंपळकर, सचिव सुरेंद्र टेंभुर्णे पदाधिकारी, माजी आमदार प्रा. राजू तिमांडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव अतुल वांदिले, माजी नगरपालिका अध्यक्ष पंढरी कापसे, राजेंद्र डागा,उबाठाचे सतीश धोबे, काँग्रेसचे प्रवीण उपासे इत्यादींची जागा निश्चिती संबंधात सखोल चर्चा झाली, स्थानिक उपजिल्हा रुग्णालयाचे परिसरात तसेच लगतच्या परिसरात शासकीय जागा उपलब्ध असल्याचे त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पटवून दिले, यादरम्यान आमदार समीर कुणावार हे सुद्धा तेथे उपस्थित झाले.
आमदार समीर कुणावर जिल्हाधिकारी राहुल कर्डिले तसेच उपरोक्त सर्व मान्यवरांच्या चर्चेअंती जिल्हाधिकारी यांनी स्थानिक उपजिल्हा रुग्णालय परिसरात असलेल्या जागेला प्राधान्याने विचारात घेतल्या जाईल असे आश्वासन दिले.
या परिसरात शासकीय जागा उपलब्ध असून काही वेगळ्या उद्दिष्टांसाठी आरक्षित केली असल्याची माहिती यावेळी उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले, तहसीलदार मासाळ यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिली, परंतु हे आरक्षण जिल्हाधिकाऱ्यांना सहज बदलवता येऊ शकते अशी भूमिका उपस्थित समिती पदाधिकारी व नेत्यांनी मांडली, जिल्हाधिकाऱ्यांनी या जागेसाठी निश्चित प्रयत्न करणार असल्याचे सांगितले, यासोबतच त्यांनी इतरही जागांचा प्रस्ताव पाठविण्यात येणार असल्याचे सांगितले.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय संघर्ष समितीच्या महिला पदाधिकाऱ्यांचे उपजिल्हा रुग्णालय परिसरात नवीन शासकीय महाविद्यालय निर्माण करण्यात यावे यासाठी गेल्या सोमवारपासून आमरण उपोषण सुरू आहे.
दि.२२ जुलै रोजी माजी आमदार राजू तिमांडे, माजी नगरपालिका अध्यक्ष पंढरी कापसे तसेच संघर्ष समितीचे सुरेंद्र बोरकर, सुनील हरबुडे यांचे सह जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांची वर द्यायला जाऊन भेट घेतली, आमदार समीर कुणावार तसेच स्थानिक अधिकारी राजकीय दबावातून हेतू पुरस्सर उपजिल्हा रुग्णालय परिसरात शासकीय जागा उपलब्ध नसल्याचे सांगत असल्याचा आरोप केला होता, या जागेविषयी जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः येऊन शहानिशा करावी असे विनंती करण्यात आल्यानंतर जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी आज हिंगणघाट शहरात भेट देऊन हा तिढा संपविला, आमदार समीर कुणावार यांनी सुद्धा या मागणीस समर्थन दिले.
स्थानिक विश्रामगृह येथे झालेल्या बैठकीनंतर आमदार समीर कुणावार तसेच माजी आमदार राजू तिमांडे व पदाधिकारी महिलांच्या उपोषण मंडपात पोहोचले, येथे आ. कुणावार व इतर मान्यवरांचे उपस्थितीत उपोषणार्थी तिन्ही महिलांचे उपोषण सोडविन्यात आले. यावेळी उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले तहसीलदार सतीश मासाळ इत्यादी अधिकारी उपस्थित होते.

ईकबाल पहेलवान साहसिक news -/24 हिंगणघाट 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!