जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांचेकडून “आझादी का अमृत महोत्सव” या अभियानाच्या अनुषंगाने जिल्हा परिषद परिसरात दिनांक: १४ नोव्हेंबर २०२१ रोजी Pan India Legal Awareness and outreach Campaign शिबीर राबविण्यात
वर्धा जिल्हा प्रतीनिधी:
वर्धा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांचेकडून “आझादी का अमृत महोत्सव” या अभियानाच्या अनुषंगाने जिल्हा परिषद परिसरात दिनांक: १४ नोव्हेंबर २०२१ रोजी Pan India Legal Awareness and outreach Campaign शिबीर राबविण्यात आले. या शिबिराचे संचालन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव निशांत परमा यांनी केले.
सदर शिबिरास प्रमुख उपस्थिती म्हणून मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठाचे न्यायाधीश यांनी उपस्थिती लावली. तसेच, वर्धा जिल्हा प्रशासनातिल अधिकारी वर्ग व कर्मचारी वर्गाचा सुद्धा मोठा सहभाग होता. ज्यामध्ये जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार, पोलिस अधीक्षक प्रशांत होळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन ओंबासे उपस्थित होते.
सदर शिबिरात तालुका निरीक्षण अधिकारी प्रज्वल पाथरे यांनी एकूण तीस गरजू लाभार्थ्यांना शिधापत्रिकांचे वाटप केले.