वर्धा,साटोडा -/जि प उच्च प्राथमिक शाळा,साटोडा येथे स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला तसेच त्यावेळी प्रारंभी प्रभातफेरी काढण्यात आली. तसेच प्रभातफेरी मध्ये,नारे हे विशेष आकर्षण होते त्यानंतर ग्रामपंचायत येथे मा.सरपंच हरीश विरुटकर यांचे हस्ते ध्जारोहण झाले,नंतर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेला हारार्पण करण्यात आले”राष्ट्र वंदना घेण्यात आली.मुख्य कार्यक्रम शाळेत घेण्यात आला,कार्यक्रमास प्रमुख अतिथी सरपंच हरीश विरुटकर ,उपसरपंच शिंदे मॅडम ,जानवे ,अनंत राऊत व सर्व सदस्य,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नरेश राऊत,उपाध्यक्ष निशा राऊत,सदस्य उपस्थित होते विशेष म्हणजे सेवानिवृत्त शिक्षक अशोक महाजन,नरेश सकंडे,दिलीप मेहरे प्रामुख्याने उपस्थित होते.ध्वजारोहण मुख्याध्यापक रवींद्र पावडे यांचे हस्ते झाले,प्रास्ताविकातून त्यांनी या दिनाचे महत्व विशद केले शाळेच्या भौतिक सुविधा बाबत चर्चा केली,प्रसंगी शाळेला बँडपथक साहित्य,गणवेश व इतर बाबींची पूर्तता करू असे आश्वासन सरपंच विरुटकर,सदस्य अजय जानवे व ग्रामविस्तार अधिकारी चौव्हान यांनी दिले.त्यानंतर स्मशान भूमीत वृक्षारोपण सर्व ग्रामपंचायत सदस्य ,शिक्षक यांचे उपस्थितीत संपन्न झाले.कार्यक्रमाचे संचालन नितेश आडे तर आभार अरुणा हजारे यांनी मानले.शालेय विद्यार्थी यांना ग्रामपंचायत व बेस्ट ऍग्रो लाईफ लिमिटेड,शाखा वर्धा यांचे वतीने येथेच्छ खाऊ वितरीत करण्यात आला.