जि.प प्राथमिक शाळा कोल्हापूर (सिं)मध्ये विद्यार्थ्यांनी लूटला खरी कमाईचा आनंद….

0

🔥जि.प प्राथमिक शाळा कोल्हापूर (सिं)मध्ये विद्यार्थ्यांनी लूटला खरी कमाईचा आनंद.

देवळी -/ तालुक्यातील जि. प. प्राथमिक शाळा कोल्हापूर (सिं)येथे बाल आनंद मेळावा आयोजित करण्यात आला.मेळाव्यामध्ये वर्ग १ ते ४ च्या सर्व विद्यार्थ्यांनी खरी कमाई करिता वेगवेगळे खाद्यपदार्थांचे स्टॉल लावले.सर्वच विद्यार्थ्यांनी या उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला त्यांनी लावलेल्या स्टॉलमध्ये खाद्यपदार्थांमध्ये कच्चा चिवडा,तळलेला चिवडा, खरमुरे, पालक मेथी पराठा, मसालेदार चने, पोहे मसाले, तुरीच्या दाण्यांचा भात, मूग वडे, अशा विविध पदार्थांचा नागरिकांनी आस्वाद घेतला होता. कार्यक्रमाचे उद्घाटन शाळा व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष गुरुदास जुमडे यांनी भूषविले. कार्यक्रमाला पालक व विद्यार्थाचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला व त्यांनी मोठ्या संख्येने खरेदी करण्यासाठी व पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी व विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले. पदार्थ खरेदी करण्यासाठी  गुरुदास जुमडे,योगेश दयने,नितेश इंगोले,पंकज कोरडे,विजय चौधरी,महल्ले काका व इतर सर्व प्रतिष्ठित व ज्येष्ठ नागरिक व पालक महिलांची शेवटपर्यंत गर्दी होती सर्वांनी आनंदाने पदार्थांचा आस्वाद घेतला. खरी कमाई या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी पैशाचा खरेदी विक्री करण्याचा व्यवहार प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे कळवा हे कार्यक्रमाचे उद्दिष्ट होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका प्रतिभा साळवे व सहाय्यक अध्यापक मोहन कोठे अंगणवाडी सेविका मीरा पवार यांनी प्रयत्न केले.

            सागर झोरे                   साहसिक News-/24 देवळी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!