देवळी -/ ज्येष्ठ नागरिकांच्या सन्मान आदर व मार्गदर्शन युवा पिढी करिता महत्त्वाचे आहे. त्यांच्या अनुभवी मार्गदर्शनातून युवा पिढीला दिशा मिळते कामाचा अनुभव मिळतो व त्यामुळे युवकांना आयुष्यामध्ये पुढे काम करण्याकरिता प्रेरणादायी ठरते असे मत युवा क्रांतीचे संस्थापक बाबा जोशी यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केले युवा क्रांतीच्या वतीने युवकांना मार्गदर्शन शिबिर व ज्येष्ठ सदस्य सोपान लोखंडे यांच्या सन्मान सोहळ्याचा कार्यक्रम मनोहर मंदिर मध्ये आयोजित करण्यात आला होता. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी दामोदर लांबट,प्रमुख अतिथी म्हणून बाबाराव जोशी,हरी खोंड, विलास जोशी, यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी कार्यक्रमाचे प्रस्तावित विनोद भगत यांनी प्रास्ताविकातून युवा क्रांतीच्या ध्येयधोरणाविषयी तसेच सार्वजनिक उपक्रम सामाजिक उपक्रम युवकांचे मार्गदर्शन शिबिर शेतकऱ्यांचे प्रश्न शेतकऱ्यांच्या बैल जोड्याचा सन्मान अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन युवा क्रांतीच्या माध्यमातून करण्यात असल्याचे सांगितले. तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे बाबाराव जोशी यांनी युवा क्रांतीचा पूर्व इतिहास आणि युवकांनी राजकारणाच्या मागे न लागता समाजाला योग्य मार्गदर्शन युवकांना दिशा आणि देशाच्या प्रगती करता युवकांनी पुढे येऊन काम करावे असे यावेळी मार्गदर्शन केले. तसेच यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष दामोदर लांबट यांनी युवा क्रांतीच्या कार्याविषयी व ध्येय धोरणाविषयी प्रशंसा करून युवा क्रांतीच्या सदस्यांनी समाजातील युवकांना योग्य मार्गदर्शन व उपक्रम राबवित असल्याबाबत प्रशंसा केली तसेच आजच्या पिढीतील जीवन कसे जगायचे याबद्दल युवकांनी ज्येष्ठांचे मार्गदर्शन मोलाचे असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे संचालन अनिल शिरसागर, तर आभार प्रदर्शन वसंत तरास यांनी मानले तर उपस्थितीत शैलेश पाळेकर,किशोर तायवाडे,अमोल डाखोरे, प्रभाकर वरके,सुरेश वैद्य, विनोद कुरडकर, लक्ष्मण इंगोले, यांच्यासह युवा क्रांतीचे पदाधिकारी व सदस्य उपस्थिती होती.