झाडगांव ( गोसावी) येथे वार्ड क्र. दोनमध्ये पाण्याचा प्रश्न पेटला…

0

              ग्रामस्थ हैराण..पिण्याच्या पाण्यासाठी करावी लागते उन्हाळ्यात भटकंती.

 वर्धा / झाडगांव (गोसावी) येथील प्रभाग क्र. दोन मध्ये ग्रामस्थ पाण्यापासून वंचित असून ग्रामस्थांना उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. येथे पंचवीस दिवसापासून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न नागरीकांना भेडसावत आहे. येथील ग्राम पंचायत सबंधितांना विचारपुस केली असता काम सुरू आहे. असे थातूरमातूर ग्रामस्थांना समजून सांगत आहेत. येथील प्रभाग क्र. दोन मध्ये कासवगतीने काम सुरू केल्यामुळे जागोजागी खड्डे करून आजपावेतो पिण्याच्या पाण्याची व्यवस्था ग्रा. पं. प्रशासन उन्हाळ्यात तातडीने करू शकले नाही. त्यामुळे नागरिक ञस्त होऊन वादविवाद होण्याची दाट शक्यता आहे..दैनदिन महिला व पुरूषांना दुसऱ्या प्रभागातून लांबून पाण्याची व्यवस्था करावी लागते आहे. ग्रा, पं प्रशासन सुस्त असून लक्ष द्यायला तयार नाही. उडवा उडवीचे उत्तर दिली जाते असे येथील नागरिकांचे म्हणणे आहे. तरी ग्राम पंचायत सबंधितांनी तातडीने उपरोक्त पाण्याचा प्रश्न निकाली काढून झाडगांव (गोसावी) येथील प्रभाग क्र. दोन मधील ग्रामस्थांना तातडीने दिलासा द्यावा असे येथील पिंटू राऊत. बाबाराव व्यापारी. गुरूदेव भजन प्रचारक सतिश व्यापारी. सुरेश धोंगडे. पद्माकर व्यापारी. वच्छलाबाई डंभारे. अनिल लोहवे.सदाशिव राऊत. उत्तमराव व्यापारी. सुरेश राऊत. कडू डंभारे. मधुकर राऊत. किसना व्यापारी. प्रतिक व्यापारी यांनी निवेदनात म्हटले आहे.

गजेंद्र डोंगरे साहसिक न्यूज /24 वर्धा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!