सेलू -/डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठा अंतर्गत बजाज कृषि महाविद्यालय पीपरी वर्धा येथील चतुर्थ वर्षाच्या विद्यार्थिनींनी टाकळी (दरणे) येथील महिलांकरिता व लहान मुलांन करीता ग्रामीण कृषी कार्यानुभव आणि औद्योगिक प्रशिक्षण अंतर्गत आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला.विद्यार्थिनींनी योग करण्याचे फायदे पटवून दिले तसेच अनेक आसन करून घेतले. महिलांनी शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. हे शिबीर प्राचार्य बी.के.सोनटक्के ,उपप्राचार्य ताई देशमुख, कार्यक्रम अधिकारी रवींद्र खर्चे, डॉ. रवी राज उदासी, डॉ. मंगेश घोडे, डॉ प्रियंका हिरोले डॉ राणी मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.कार्यक्रमाचे प्रात्याक्षिक रुची डायगव्हाणे, श्रूतिका दुर्ग, मंजिरी धकाते, कोमल छाडी,चारुक्षी चौधरी, अर्पणा भोंग यांनी करून दाखविले.