डिगडोह नदीवरील पूल येण्या जाण्यासाठी बनला धोकादायक….

0

🔥बांधकाम विभागाचे दुरुस्ती कडे दुर्लक्ष.

देवळी -/ तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे यशोदा नदीला आलेल्या पुरामुळे आधीच नादुरुस्त असलेले डिगडोह गावाजवळील यशोदा नदीजवळी पुलाचा काही भाग पाण्यात वाहून गेल्याने काही दिवसापूर्वी देवळी तालुक्यापासून डिगडोह गावाचा संपर्क तुटला होता. तुटलेल्या भागावर गोटे ठेवून सध्या नागरिकांची ऐ जा सुरू आहे डिगडोह येथील नागरिकांना दररोज दूध व्यवसाय,शेती उपयोगी साहित्य घेणे, विद्यार्थ्यांना शाळेकरीता देवळीला दररोज येणे जाणे करावे लागते, चोवीसहि तास डिगडोह देवळी रहदारी मोठ्या प्रमाणात सुरू असते.डिगडोह ला जाण्या व येण्याकरिता याच पुलावरून मार्ग असल्याने येणाऱ्या जाणाऱ्यांना जीव मुठीत धरून पुलावरून येणे जाणे करावे लागत आहे.या पुलाला कठेडे नाही व काही भाग वाहून गेलेला आहे अशा परिस्थितीत या पुलावरून बैलगाडी,दुचाकी, व लहान स्वरूपाची चार चाकी वाहने जाने येणे करीत आहे. या पुलाच्या वाहून गेलेल्या भागावर मुरूम टाकून व्यवस्थित करण्यात यावा जेणेकरून सध्याची तात्पुरती वाहतूक सुरू राहील अशी नागरिकांची मागणी आहे.तसेच या ठिकाणी नवीन पुलाला मंजुरी मिळालेली आहे पण अजून पर्यंत काम सुरू झालेले नाही काम सुरू होण्याच्या आधी रहदारी करिता पुलाच्या बाजूने गडर टाकून रहदारीकर्ता मार्ग तयार करण्यात यावा अशी नागरिकांनी मागणी केली आहे.    🔥अभियंतेचा खोटारडेपणा.

पंतप्रधान सडक योजनेचे अभियंता दीपक भोसले यांना पुलाच्या दुरुस्तीबाबत विचारणा केली असता या ठिकाणी नवीन पूल बांधण्यात येणार आहे असे सांगितले व नागरिकांनी डिगडोह, नागझरी,सोनेगाव, मार्गे देवळीला येणे जाणे करावे असे सांगितले. व आठ दिवसात डागडुगी करण्यात येणार असल्याचे सांगितले.

नागरिकांना नागझरी सोनेगाव मार्ग येणे जाणे लांब पडत असल्याणे लांब पडत असल्या कारणाने गडर टाकून पूल तयार करण्यात यावा अशी नागरिकांनी मागणी केलेली आहे. तसेच 15 ते 20 दिवस लोटून सुद्धा या पुलाच्या बांधकामची  व डाग डुगी कडे संबंधित बांधकाम विभागाने पूर्णतः दुर्लक्ष केलेले आहे.त्यामुळे अभियंताचा खोटारडेपणा दिसून येत आहे.त्यामुळे नागरिकांमध्ये असंतोष पसरला असून आंदोलनात्मक भूमिका स्वीकारणार असल्याची चर्चा आहे.
तरी शासनाने या गंभीर समस्या कडे लक्ष देऊन पुलाचे काम त्वरित करून नागरिकांना येण्या जाण्यासाठी सुविधा निर्माण करून द्यावी अशी मागणी या भागातील व डिगडोह गावातील नागरिक करीत आहे.

( क्रमशः )

सागर झोरे साहसिक news -24 देवळी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!