डियाजिओ तर्फे गोव्यातील चालकांना जागरुक करण्यासाठी ड्रायव्हर सेन्सेटायझेशन टॅब लॅब्स ची सुरुवात: ‘राँग साईड ऑफ द रोड’ उपक्रमा अंतर्गत योजनेची सुरुवात…

0

🔥पणजी येथील टॅब लॅब ही डियाजिओ इंडिया च्या ‘राँग साईड ऑफ द रोड’ (WSOTR) उपक्रमाचा एक भाग असून त्याचे उद्घाटन गोव्याचे माननीय मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. WSOTR टॅब लॅब्स आता गोव्यातील ७ आरटीओज मध्ये कार्यान्वित.

🔥डियाजिओ तर्फे २०३० पर्यंत जागरुकता निर्माण करुन १ दशलक्ष लोकांमध्ये मद्यपान करुन गाडी न चालवण्याबाबत जागरुकता निर्माण करण्याचे लक्ष्य.

गोवा,पणजी -/ डियाजिओ इंडिया (युनायटेड स्पिरिट्स लिमिटेड) ने भारत केअर्स आणि गोवा सरकारच्या वाहतूक विभागाच्या संयुक्त विद्यमाने आज नवीन ड्रायव्हर सेन्सिटायझेशन टॅब लॅब चे उद्घाटन पणजी येथील आरटीओ कार्यालयात केले, हा उपक्रम ‘राँग साईड ऑफ द रोड’ (WSOTR) अंतर्गत सुरु करण्यात आला आहे. या लॅब चे उद्घाटन गोव्याचे माननीय मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. हा उपक्रम म्हणजे डियाजिओ इंडियाच्या रस्ते सुरक्षा आणि जबाबदारीने सेवन करण्याचा प्रसार करण्याच्या मिशननुसार आहे. या सुरुवाती मुळे WSOTR केंद्रे आता गोव्यातील सर्व आरटीओज मध्ये सुरु करण्यात आली आहेत.
डियाजिओ इंडिया च्या ‘स्पिरिट ऑफ प्रोग्रेस’ या इएसजी ॲक्शन प्लॅनचा एक भाग म्हणून राँग साईड ऑफ द रोड (WSOTR) हा शिक्षणावर आधारीत उपक्रम असून यांतून वागणुकीतील बदल घडण्यासाठी डिजिटल उपकरणांचा वापर करण्यात येत आहे. आकर्षक तंत्रज्ञानावर आधारीत मॉड्युल्स मुळे WSOTR मध्ये चालकांना गुंतवून रिअल लाईफ सिनारिओ सिम्युलेशन केल्याने कशा प्रकारे असुरक्षित गाडी चालवण्यापासून वाचावे याचे ज्ञान देण्यात येते. या टॅब लॅब्स मध्ये लायसन्स साठी अर्ज करणार्‍या प्रत्येकाला४५ मिनिटांचे मॉड्युल पार करणे आवश्यक असून याचे वैशिष्ट्य म्हणजे संभाषणात्मक व्हिडिओ कंटेंट आणि वागणूकीचे मोजमाप करत सुरक्षित गाडी चालवण्याच्या सवयींवर लक्ष्य केंद्रित करण्यात येते. रियल लाईफ क्षणांचा वापर करुन हा प्रोग्राम सुरक्षेवर लक्ष देऊन चालकाची वागणूक आणि रस्ते सुरक्षा यावर भर देतो. पणजीतील ही नवीन टॅबलॅब म्हणजे संपूर्ण भारतातील वाढत्या नेटवर्क पैकी एक असून संपूर्ण भारतात ७०+ नवीन टॅबलॅब्सचा एक भाग असेल. यामुळे रस्ते सुरक्षेसाठी असलेली वचनबध्दता अधोरेखित होते.
गोव्याचे माननीय मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले “ या सीएसआर प्रकल्पाची अंमलबजावणी केल्या बद्दल आम्ही भारत केअर्स आणि डियाजिओ इंडियाचे अभिनंदन करतो. ‘राँग साईड ऑफ द रोड’ मधील शैक्षणिक मॉड्युल्स हे गाडी चालवतांना नेहमी होणार्‍या चुकांना अधोरेखित करतात आणि त्या चुकांमुळे कशा प्रकारे कोणाचे जीवन आणि परिवार नष्ट होऊ शकतात हे दिसते. म्हणूनच आम्ही लायसन्ससाठी अर्ज करणार्‍या प्रत्येकाला ही ४५ मिनिटांची फिल्म पाहणे अनिवार्य करत आहोत ज्यामुळे दीर्घकाळात अपघात कमी करण्यासाठी ही छोटी पावले आहेत. या उपक्रमामुळे नक्कीच अपघातांची संख्या कमी होईल. आमचे आरटीओ सुध्दा यात सहकार्य करतील आणि ही फिल्म पाहिल्याशिवाय नवीन लायसन्स देणार नाहीत किंवा त्याचे नुतनीकरण करणार नाहीत.”
डियाजिओ इंडिया च्या कॉर्पोरेट रिलेशन्स चे प्रमुख देवाशिष दासगुप्ता यांनी सांगितले “ दृष्टिकोनातील बदल हा ड़्रिंक ॲन्ड ड्राईव्ह मधील महत्त्वाचा घटक आहे. आमच्या स्पिरिट ऑफ प्रोग्रेस इएसजी प्लान अंतर्गत जबाबदारीने सेवन करण्याच्या योजनेसह आम्ही अनेक शैक्षणिक उपक्रमात गुंतवणूक केली आहे. आमचे भागीदार भारत केअर्स आणि गोवा सरकारच्या सहकार्याने आम्ही आता WSOTR उपक्रमाच्या माध्यमातून चालकांना ज्ञान देऊन जबाबदारीने काम करण्यास जागरुक करत आहोत. गोव्यातील प्रत्येक आरटीओ मध्ये टॅबलॅब ची सुरुवात करणे आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.”
भारत केअर्सच्या सोशल इम्पॅक्ट प्रोग्राम्स चे एव्हीपी अभिषेक त्यागी यांनी सांगितले “ या सकारात्मक बदलाच्या प्रवासासह रस्ते सुरक्षेमध्ये भाग घेतांना भारत केअर्सला डियाजिओ इंडिया बरोबर सहकार्य केल्याचा अभिमान आहे. आमच्या या सहकार्यामुळे नाविन्य, शिक्षण आणि तंत्रज्ञानाचा वापर करुन समाजातील आव्हानांनुसार बदल घडवण्याचे हे एक छोटे प्रात्यक्षिक आहे. टॅब लॅब सारख्या उपक्रमामुळे आम्ही अधिक सुरक्षित आणि अधिक जबाबदार समाज निर्माण करण्यासाठी एकत्रित प्रयत्नांना बळ देत आहोत.”

ब्युरो रिपोर्ट साहसिक News-/24 वर्धा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!