🔥डॉक्टर संजय आदमने, अध्यक्ष पद्मश्री फाउंडेशन नागपूर .यांना नटश्रेष्ठ निळू फुले पुरस्कार प्राप्त,जिल्हा समिती च्या वतीने अभिनंदन.
वर्धा -/ महाराष्ट्राच्या जडणघडणीत सांस्कृतिक/सामाजिक क्षेत्राचा फार मोठा वाटा आहे.यामध्ये नट श्रेष्ठ निळू फुले यांच्या रुपेरी पडद्यावरील अभिनय अजरामर झाला आहे. मात्र खलनायकांच्या गर्दीतील मानवतेची हाक देणारा निळू भाऊंच्या रूपातील चेहरा दुर्लक्षित राहिला त्यांच्या समाज राष्ट्र सेवेला समर्पित कार्याला उजाळा देण्यासाठी निळू फुले आर्ट फाउंडेशन कार्यरत आहे.
यावर्षी सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल सन्माननीय डॉ. संजय आदमने अध्यक्ष पद्मश्री फाउंडेशन नागपूर.
यांना मराठी सिने कलावंत श्री संदीप पाठक, डॉ. रमेश थोरात संस्थापक, ॲड नितीन धूत अध्यक्ष, तसेच सुधाकर गीते सचिव नटश्रेष्ठ निळू फुले आर्ट फाउंडेशन, अकोला च्या वतीने नटश्रेष्ठ निळू फुले पुरस्काराने दि. १७ आगस्ट रोजी पुष्पगुच्छ..शाल श्रीफळ सन्मानचिन्ह व प्रशस्तीपञ देऊन सन्मानित करण्यात आले.
याबद्दल त्यांचे ग्रामगीताचार्य श्री.प्रमोद भोंगे दादा पुलगाव,ग्रामगीताचार्य श्री शंकराव मोहोड वर्धा, श्री दिलीप रोकडे सर संगीत शिक्षक वर्धा, श्री श्यामजी नाकाडे, डॉ. अलोने, राष्ट्रीय प्रबोधनकार हभप अशोक भगत दादा .प्रसिद्धी प्रमुख गजानन जिकार या सर्वांनी जिल्हा समिती च्या वतीने अभिनंदन केले.