वर्धा -/दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्थेचे विशेष कार्यकारी अधिकारी डॉ अभ्युदय मेघे, यांनी आज अचानक काँग्रेस पक्षात प्रवेश घेतल्याने जिल्ह्यातील राजकीय नेत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत त्यांनी आज दि.८ ऑगस्ट रोजी पक्षप्रवेश केला.सावंगी मेघे येथील दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्थेचे विशेष कार्यकारी अधिकारी डॉ अभ्युदय मेघे गेल्या दोन वर्षापासून भावी आमदार म्हणून प्रयत्नशील होते. मेघे कुटुंबिय भाजपात असतानाच त्यांनी स्थानिक आमदार डॉ पंकज भोयर यांना पक्षांतर्गत आव्हान देण्यासाठी कंबर कसली होती. वर्धा विधानसभा मतदारसंघात आरोग्य शिबीरासह एकामागून एक असे अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले. त्यामुळे दादांना भाजपाची उमेदवारी मिळणार की काय? असा प्रश्न विचारला जात होता त्यादरम्यान विधानसभा निवडणुका अगदी उंबरठ्यावर येऊन ठेपल्या आहेत अशातच आज दादांनी अचानक काँग्रेस मध्ये प्रदेश नाना पटोलेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश घेतले त्यामुळे जिल्ह्यातील मोठी खळबळ उडाली असून राजकीय नेत्यांच्या भुवया उचावल्या आहे. येत्या काळात हजारो पदाधिकारी व कार्यकर्ते काँग्रेस मध्ये दाखिल होतील अशी चर्चा वर्धा जिल्ह्यामध्ये सुरू असल्याचे माहिती मिळाली आहे त्यामुळे जिल्ह्यात भाजपासाठी हा एक मोठा धक्का मानला जात आहे काँग्रेसमध्ये आधीच एक दादा होते त्यात आणखी एक दादांची एन्ट्री झाल्याने काँग्रेसला चांगले दिवस आल्याचे बोलल्या जात आहे. त्यांच्यासोबत काँग्रेसचे वरिष्ठ पदाधिकारी प्रमोद हिवाळे, सलीम कुरेशी, इत्यादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.