🔥डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय महाड येथे तिमिरातून तेजाकडे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रम सम्पन्न.
बोरघर,माणगांव -/डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागा द्वारे श्री. सत्यवान रेडकर, कनिष्ठ अनुवाद अधिकारी, सीमाशुल्क विभाग, भारत सरकार, मुंबई यांच्या प्रमुख मार्गदर्शनाचा लाभ महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना मिळाले. मार्गदर्शनातून रेडकर यांनी सरकारी सेवा कोणकोणत्या आहेत, त्या मध्ये कोणकोणती पदे असतात, मिळविण्यासाठी कोणत्या स्पर्धा परीक्षा असतात, त्यांचे आयोजन कोण करते, भारत सरकार आणि राज्य सरकार यांच्या कोणत्या परीक्षा असतात, त्यासाठी काय पात्रता हवी असते, कश्या पद्धतीने अभ्यास करायचा असतो, क्लास लावायची गरज कशी नसते, अभ्यास कसा करावा याचे समग्र स्वरूपाचे उदाहरणासह स्पष्टीकरण दिले.,चर्चा केली ज्यामुळे विद्यार्थ्यांना सरकारी नोकरी मिळविण्यासाठी प्रेरणा निर्माण झाली.
अध्यक्षीय भाषणात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ योगेश प्रमिला प्रभाकर बोराळे यांनी आपले भविष्य घडविण्यासाठी स्पर्धा परीक्षा ही अत्यावश्यक आहे तशी पदवी देखील महत्वाची आहे, मग ती कोणतीही असो, गुण जास्तच हवे असे नाही, कला, वाणिज्य व विज्ञान, अभियांत्रिकी, कृषी, वैद्यकीय स्तरावरील कोणतीही पदवी स्पर्धा परीक्षेसाठी महत्वाची असते आणि एकदा अपयश आले कि संपले सर्व असा अर्थ होत नाही. अपयशाकडे सकारात्मक आणि गांभीर्याने पाहिल्यास आपले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कारणीभुत ठरते.
कार्यक्रमाला उपप्राचार्य डॉ राकेश सोनार, एन् एस् एस् कार्यक्रम अधिकारी प्रा गणेश वतारी, प्रा. बटावले, प्रा. विकास जाधव, प्रा. ईशरत मॅडम, प्रा. नेहा पवार मॅडम, प्रा. पूर्वा चक्रदेव मॅडम, प्रा. सुदर्शन कुलाबकर आणि कला, वाणिज्य विभागातील 200 विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. पूर्वा चक्रदेव मॅडम यांनी केले आणि प्रा. गणेश वतारी सरांनी आभार प्रदर्शन केले आणि कार्यक्रमाची सांगता केली.