देवळी – / डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून युवा संघर्ष मोर्चाचे अध्यक्ष किरण ठाकरे यांनी महात्मा गांधी आयुर्वेदीक दवाखाना सावंगी यांचे सहकार्याने युवा संघर्ष मोर्चाचे कार्यालयात दि. सहा डिसेंबर रोजी सकाळी दहा ते तीन वाजेपर्यंत आरोग्य तपासणी व मोफत औषधोपचार शिबीर आयोजित केले होते. सर्वप्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व हारार्पण करण्यात आले.
शिबिरात दोनशे रुग्णांची तपासणी करण्यात आली. शिबिर यशस्वी करण्याकरिता प्रविण कात्रे, गौतम पोपटकर, स्वप्नील मदनकर,सागर पाटणकर, सुरज भगत व इतरांनी सहकार्य केले.