डॉ. बी. आर आंबेडकर विद्यालयात दहावी बोर्ड परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव….

0

हिंगणघाट -/ एस.एस.सी. बोर्ड परीक्षेतील गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा डॉ.बी .आर आंबेडकर विद्यालयात संस्थेचे कोषाध्यक्ष जी.एस .भगत यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आले विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घेऊन नोकरी, पैसा, सामाजिक प्रतिष्ठा मिळवल्यानंतर त्याचा उपयोग केवळ स्वतःसाठी व स्वतःच्या कुटुंबासाठी न करता समाजातील गोरगरीब लोकांना कसा करता येईल याचा कायमचा विचार करावा अशी मार्गदर्शन कोषाध्यक्ष जीएस भगत यांनी व्यक्त केले. यावेळी विचार मंचावर प्रमुख उपस्थिती म्हणून संस्थेचे संचालक पराग अनिल जवादे, प्राचार्य एच.पी.गुडदे उपमुख्याध्यापक डॉ. चंद्रकांत नगराळे संचालक बी. एस .पाटील, संचालक आर. के .पाटील , प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक दिलीप देवतळे , पर्यवेक्षक रवींद्र शिरपूरकर पर्यवेक्षिका सुनिता खैरकार यांच्या हस्ते विशेष शांताराम भोयर 96.00%, रेश्मा किशोर आखाडे 93.20%, साची अनंत रिंगणे 93.20%, कपिल पद्माकर बोळवटकर 92.60%, अंशिका अमर अवथरे 92.40%, नंदिनी नारायण तराळे 92%, आचल यशवंत देवढे 91%, राधिका सतीश झिलपे 91%, स्नेहा संजय भेदुरकर 90.60%, वैष्णवी नामदेव पिसे 90.40%, दिव्यम पतीत ,वावरे 90.40%, रोहित प्रकाश वावरे 89.80% या गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांच्या आणि त्यांच्या पालकांचा सत्कार करण्यात आला गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय त्यांना शिकविणाऱ्या सर्व शिक्षक विषय शिक्षकांना व आपल्या पालकांना आणि विद्यालयातील शैक्षणिक वातावरणाला दिले. गुणगौरव सोहळ्याचे संचालन परीक्षा विभागाच्या प्रमुख संध्या राऊत तर आभार प्रदर्शन हर्षल बागडे सर यांनी केले व कार्यक्रमाची सांगता राष्ट्र गीताने झाली. गुणगौरव कार्यक्रमाला सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते .

ईकबाल पहेलवान साहसिक न्यूज -/24 हिंगणघाट 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!