🔥नेहरू मार्केट मधीले ११ दुकान फोडणारे ५ अट्टल चोरटे सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये कैद.
आर्वी -/ शहरातील मध्यरात्री १ ते ३ च्या दरम्यान मुख्य नेहरू मार्केट येथील तब्बल ११ दुकानाचे कुलूप न तोडता शटर हाताने ओढून चोरट्यांनी काही दुकानातील कोणतेही वस्तूला हात न लावता रोख लंपास केली. तर काही दुकानातील चक्क चिल्लर सह रोख व सिगारेटची पाकीट लंपास केले तर जेठानंद गोकुळदास लालवानी यांच्या दुकानातील १ लाख ४० हजार रुपये रोख लंपास केली आर्वी शहरात नेहरू मार्केट मधील अशी चोरीची पहिली घटना असल्याचे ही चोरी ऐतिहासिक असल्याने अशा छोट्यांवर अंकुश लावणे गरजेचे आहे असे पोलीस तपास सुरू असताना व्यापारी संघटनेचे अध्यक्ष हाजी सुलेमान यांनी सांगितले.पेट्रोलिंग वर असणाऱ्या पोलीसांना ३ वाजताच्या सुमारास पांढऱ्या रंगाच्या दुचाकी स्वार असलेले २ अज्ञात व्यक्ती चौकातून जात असताना त्यांचा पाठलाग केला असता ते पळताना दिसल्यामुळे त्यांच्याजवळ पांढऱ्या रंगाची स्कुटी दीसल्यामुळे स्वयंशास्पद त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.यापूर्वी आर्वी शहरात एवढ्या मोठ्या प्रमाणात दुकान फुटले नाही. दुकाने फुटल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला. या घटनेची माहिती नेहरू मार्केट मधील हॉटेल व्यावसायिक नितीन जयसिंगपूरे पहाटे ६ वाजता आपले हॉटेल उघडण्याकरिता येत असताना त्यांना नेहरू मार्केट मधील तीन-चार दुकानाचे शटर फोडले दिसले असता त्यांनी त्या दुकान मालक संजय माखीज्या यांना फोन करून माहिती दिली तसेच त्यांनी या घटनेची आर्वी पोलिस स्टेशनला माहिती दिली. तसेच आर्वी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सतीश डेहनकर यांच्या मार्गदर्शनात दिगंबर रुईकर, खेमसिंग बोहचळे, अंकुश निचत, निलेश करडे असे पोलीस कर्मचारी यांनी तपास सुरू केला हाेता.याबाबत व्यापारी संघटना द्वारे दिलेल्या माहितीनुसार, रविवारी पहाटे १ ते ३ वाजताच्या सुमारास सीसीटीव्ही मध्ये दिसलेल्या पाच चोरटे हाताने शटर ओडून चोरी करत असल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाल्याचे दिसत आहे. त्यांनी नेहरू मार्केट येथील तब्बल ११ दुकानाचे शटर उचलून चोरी केली व २ दुकानाचे शटर फोडण्याचा प्रयत्न केला परंतु सेंटर लॉक असल्यामुळे शटर तोडण्यास असमर्थ ठरले त्यामध्ये , किराणा दुकान, जनरल स्टोअर्स व तंबाखू दुकान आदींचा समावेश आहे. नेहरू मार्केट मधील हरी ओम किराणा, जेठानंद गोकुळदास लालवानी किराणा ,संजय ट्रेडर्स, प्रकाश आत्मारामजी गुल्हाने किराणा, कृष्णा किराणा ,राजू किराणा, जयश्री किराणा, ताजदार किराणा, लक्ष्मी कलेक्शन, लक्ष्मी किराणा, धणपतलालजी टावरी किराणा,संजय ट्रेडर्स या दुकानाचा समावेश असून आणखी २ किराणा दुकानाचे शटर फोडण्याचे प्रयत्न केले. दुकाने फोडल्यानंतर त्यातील रोख रक्कम व सिगरेट पाकीट घेऊन हे चोरटे २ स्कुटी एक पांढरा रंगाची व दुसरी लाला रंगाची असे दुचाकीने फरार होत असल्याचे सीसीटीव्हीत दिसुन येत आहे. या चोरट्यांनी काही ठिकाणी तोंडावर कागदी मास्क लावल्याचे दिसत असून, एक दुकान फोडल्यानंतर काही अंतर पुढे गेल्यावर लगेच दुसरे दुकान फोडत होते. रोख रक्कम आणि इतर वस्तू चोरी बरोबरच दुकानाचे शटर तोडल्याने दुकानदारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.एवढ्या मोठ्या प्रमाणात चोरी होऊनही रात्रपाळीवरील पोलिस नेमके काय करत आहेत, असा प्रश्न नागरिक व व्यापाऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. या प्रकारामुळे परिसरातील व्यवसायिकांचे चांगलेच धाबे दणाणले असून, या प्रकाराला त्वरित आळा घालावा, अशी मागणी व्यापाऱ्यांकडून करण्यात येत आहे.माजी आमदार दादारावजी केचे व खासदार अमर काळे यांना घटनेची माहिती मिळताच नेहरू मार्केटमध्ये येऊन पाहनी केली असता लगेच पोलीस उपविभागीय अधिकारी यांना फोन करून घटनेची माहिती दिली व झालेल्या चोरीची सखोल चौकशी करून नेहरू मार्केटमध्ये चार पोलीस कर्मचाऱ्यांची गस्त लावा अशी मागणी केली.
🔥नेहरू मार्केटमध्ये झालेल्या चोरीच्या घटनेची कसून चौकशी.
आर्वी पोलिसांनी वर्धेवरून फिंगर प्रिंट्स स्काेटचे जगदीश डफ व डॉग स्काॅटचे पोलीस उपनिरीक्षक सुजित डांगरे व पाे. ह. राजेश बीसणे, मनोज काकडे व ब्रूनो डॉग सह यांना प्राचारण करून ब्रूनो नावाच्या डॉगला पूर्ण नेहरू मार्केट मधील फुटलेले दुकाने फिरून कसून तपास केला तसेच ॲडिशनल एस पी सागर कडवे, पोलीस उपविभागीय अधिकारी खंडेराव व आर्वीचे ठाणेदार सतीश डेहणकर यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास सुरू आहे.