तांदूळ घेऊन जाणारा ट्रक आष्टी पोलिसांनी पकडला….

0

हाच तो रेशन चा तांदूळ पोत्यात भरून मोर्शी वरून आष्टी मार्गे येत असल्याची गोपनीय माहिती प्राप्त होताच आष्टी पोलीसनी ट्रक घेतला ताब्यात…

आष्टी शहीद -/ आष्टी पोलीस ठाण्याला लागून असलेल्या राष्ट्रीय महामार्ग वर तांदुळाचे पोते भरलेला ट्रक आष्टी पोलिसांनी पकडून जप्त केला. ट्रक मधील तांदूळ हा शासकीय कि खाजगी याबद्दल तपासणी करण्यासाठी यंत्रणा कामी लागली असून यां बाबत चा उलगडा व्हायचा आहॆ.सविस्तर असें कि,अमरावती जिल्ह्यातील मोर्शी येथून MH४०CD६६७१क्रमांक असलेला मोठा ट्रक मध्ये तांदळाचे पोते भरून आष्टी च्या दिशेने येत आहॆ अशी गोपनीय माहिती आष्टी पोलिसांना मिळाली. ठाणेदार सुनीलसिंग पवार व त्याचे सहकारी यांनी यां ट्रक चा पाठलाग करून हा ट्रक आष्टी पोलीस ठाण्याला लागून असलेल्या राष्ट्रीय महामार्ग वर अडवून पकडण्यात यश मिळविले. यां ट्रक मध्ये असलेला तांदूळ हा तहसील कार्ययलयातील गोडाऊन मधील असावा किंवा तो लाभार्थी यांच्या कडून खरेदी करून जमा केला असावा किव्हा एखादय राशन्न दुकान दाराकडून खरेदी केला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. अशी आष्टी शहरात चर्चा होती. ठाणेदार पवार यांनी दिलेल्या माहिती नुसार ट्रक जप्त करण्यात आला असून त्या ट्रक मध्ये नेमके काय आहे हे तपासणी केल्यावर समजेल असें सांगण्यात येते. आष्टी तहसीलदार यांना पत्र देण्यात आले असून पोत्यात भरलेला तांदूळ हा शासकीय कि खाजगी हे तपासणी करण्यासाठी हजर व्हावे असें पत्र देण्यात आल्याचे सांगितले. महसूल विभाग यांनी चॊकशीव खात्री केल्यावर च यां ट्रक मधील तांदूळचा खुलासा होईल असें सांगण्यात येते. ट्रक जप्त होताच तांदूळ माफियाचे धाबे दानाणले आहॆ.
ठाणेदार सुनीलसिंग पवार पुढील तपास करित आहॆ.

नरेश भार्गव साहसिक न्यूज-/24 आष्टी शहीद 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!