🔥तुकाराम दास घोडे महाराजांना राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार.
वर्धा -/येथे प्रदान महाराष्ट्र राज्य शासनाने दिलेला हा सन्मानच होय. राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा 2023-2024 चा पुरस्कार व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा, सर्वधर्मसमभाव संत महापुरुषांचे आणि मानवतेचं कार्य करणारे आदरणीय तुकारामदास घोडे महाराज कुरझडी जामठा जिल्हा वर्धा स्थळ यशवंतराव चव्हाण सभागृह जगन्नाथ भोसले मंत्रालय समोर मुंबई येथे माननीय सामाजिक न्याय मंत्री संजयजी शिरसाठ साहेब, राज्यमंत्री, केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले, डॉक्टर हर्षवर्धन कांबळे साहेब प्रधान सचिव, सप्त खंजिरी वादक सत्यपाल महाराज,सामाजिक न्याय माधुरी मिसाळ, श्री प्रभाकरजी घाटोळे, सर्व मान्यवर मंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये देण्यात आला. या राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्काराबद्दल कुरझडी गावात व गावागावात जिल्ह्यामध्ये तुकारामदास घोडे महाराज यांना कौतुकास्पद जणू शुभेच्छाचा वर्षावचं होत आहे.