🔥याप्रमाणे,दक्षीण आर्णी वनपरीक्षेत्रातील दातोडी घाटावरून होणार्या वाळु वाहतुकीचा रस्ता बंद करण्यात आला असुन यामध्ये सुद्धा वनाधिकारी चैतन्य भोजने यांनी वनकायद्याचे उलघंन केले आहे.
🔥हाच तो दक्षिण आर्णी वनक्षेत्र वाळू तस्करांच्या घशात; लाचखोर वनाधिकारी चैतन्य भोजने यांच्या आशीर्वादाने जंगलाची ‘लूट’ सुरू! 🔥हाच तो सागवान वृक्षांची कत्तल करून तस्करांसाठी बनवले रस्ते; ‘ 🔥दै. साहसिक’च्या दणक्यानंतर दातोडी घाट बंद,मात्र जलांद्रीतून तस्करी जोरात.
यवतमाळ -/दक्षिण आर्णी वनपरीक्षेत्र सध्या भ्रष्टाचाराचा केंद्रबिंदू बनले असून, येथील वनपरीक्षेत्र अधिकारी चैतन्य भोजने यांच्या थेट वरदहस्ताने राखीव वनाचे अस्तित्व धोक्यात आले आहे. पैशांच्या हव्यासापोटी या वनपरीक्षत्राला जणू वाळू तस्करांना ‘भाडेतत्त्वावर’ दिले की काय, असा संतापजनक प्रश्न आता नागरिक विचारत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण आर्णी वनपरीक्षेत्रात अजस्र यंत्रणा वापरून राखीव वनाचे नियम धाब्यावर बसवत रस्ते तयार करण्यात आले. ‘दै. साहसिक’ ने हे गंभीर प्रकरण चव्हाट्यावर आणल्यानंतर, स्वतःला वाचवण्यासाठी वनाधिकारी चैतन्य भोजने यांनी तातडीने हालचाली करत दातोडी घाटाचा रस्ता बंद करण्याचे नाटक केले. मात्र, ही केवळ ‘डोळ्यात धूळफेक’ असल्याचे स्पष्ट झाले आहे.
दातोडी घाट बंद केला असला, तरी जलांद्री घाटावरून होणारी अवैध वाळू वाहतूक अद्यापही ‘जैसे थे’ आहे. धक्कादायक बाब म्हणजे, जलांद्री घाटाचा मालक शुभम गायकवाड हा पुण्यात बसून यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील संपूर्ण प्रशासन आपल्या मुठीत ठेवत असल्याचे चित्र आहे. त्याच्या तालावर येथील वनविभाग नाचत असून, रात्रंदिवस जंगलातून ट्रॅक्टर आणि टिप्पर धावत आहेत.
वाळू तस्करांना रस्ता करून देण्यासाठी शेकडो मौल्यवान सागवान वृक्षांची निर्घृण कत्तल करण्यात आली आहे. एकीकडे जंगल वाचवण्याची जबाबदारी असलेले क्षेत्रसहाय्यक आणि वनरक्षक मात्र कर्तव्य सोडून वनाधिकारी भोजने यांच्यासाठी ‘वसुली’ करण्यात व्यस्त असल्याची चर्चा परिसरात आहे. पैनगंगा नदीच्या पात्रातून दातोडी, वरुड तुका, जलांद्री, चिमटा आणि आयता बिलायता या घाटांमधून राजरोसपणे वाळू उपसा सुरू आहे.
कायद्याचे उल्लंघन: वन कायद्याची पायमल्ली करत राखीव वनात जेसीबी आणि वन टेन मशीनचा वापर.
मौन संमती: वनाधिकारी भोजने यांच्या दुर्लक्षामुळे शासनाचा कोट्यवधींचा महसूल बुडत असून पर्यावरणाचे कधीही न भरून निघणारे नुकसान होत आहे.
भकास जंगल: सागवान चोरी आणि अवैध रस्त्यांमुळे एकेकाळी हिरवेगार असलेले दक्षिण आर्णी वनक्षेत्र आता भकास झाले आहे.
या गंभीर प्रकाराकडे वरिष्ठ वनाधिकाऱ्यांनी लक्ष देऊन, निसर्गाची लूट करणाऱ्या चैतन्य भोजने आणि वाळू तस्करांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे. तसेच वनाधिकारी चैतन्य भोजने यांनी आपल्या कर्तव्याचा दुरउपयोग केल्याने वाळु तस्करासह वनगुन्हे दाखल करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी निर्सग प्रेमीकडुन होत आहे.(क्रमशः)