दारु बंदीचे समर्थन करणाय्रा पक्षांनाच मतदान करनार.,दारु मुक्ती आंदोलकांची भूमिका

0

वर्धा / महाराष्ट्रातील शिंदे सरकारचे सध्याचे धोरण हे महिला, युवक,शेतकरी यांचे विरोधी असल्याचे दारू मुक्ती आंदोलनात जाहिर आवाहन करण्यात आले असून या सरकारला मतदान न करण्याची भुमिका शेतकरी बचाओ आंदोलन पुरस्कृत दारूमुक्ती आंदोलकानी भूमिका घेतली असून महाराष्ट्र राज्यातील राजकीय पक्ष येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्र राज्यात व देशात दारूबंदीचा प्रस्ताव मांडण्याची भूमिका घ्यावी. तसेच मी दारू प्राशन करणार नाही व मतदारांना दारू पाजणार नाही. या प्रकारचे प्रतिज्ञापत्र देणाऱ्या पक्ष उमेदवारांना मतदान करण्याची स्पष्ट भूमिका यावेळी घेण्यात आली होती. शेतमालास स्वामीनाथन आयोगाप्रमाणे सी टू अधिक 50 टक्के नफा देऊ शेतकऱ्यांना संपूर्णपणे कर्जमुक्ती देण्याचे समर्थन करणारे, त्याचप्रमाणे देशातील तरुणांना रोजगार उपलब्ध करून द्यावा. किंवा बेरोजगाराणा किमान 10हजाररुपये भत्ता देण्याची जबाबदारी घेणाऱ्या तसेच शेतकरी व मजुरांना अनुक्रमे दहा हजार, पाच हजार रुपये निवृत्ती वेतन देण्याचे लिखित आश्वासनदेणाऱ्या राजकीय पक्षाच्या उमेदवारांना मतदान करण्याची भूमिका दारू मुक्ती आंदोलकांन कडून करण्यात आली होती. या मागण्या पूर्ण करणाऱ्या उमेदवारांचा प्रचार करण्याचे यावेळी ठरविन्यात आले. या प्रकारे दारू मुक्ती आंदोलनाचे प्रमुख संयोजक भाई रजनीकांत तसेच राष्ट्रीय पातळीवर मा.मेधाताई पाटकर राष्ट्रीय संयोजक ,प्राध्यापिका सुशीलाताई मोराळे राष्ट्रीय संघटिका ,राष्ट्रीय सह संघटिका विना कुमारी वाईकर, राज्य संघटिका बेबीबाई वाईकर, एडवोकेट संतोष मस्के राज्य संघटक ,विजय देशमुख विदर्भ संघटक ,मंगलाताई सोनवणे संघटिका नाशिक विभाग ,शालिनी वाघमारे संघटिका जिल्हा सातारा ,सत्यभामा सुंदरकर संघटिका मराठवाडा, सीसीली कार्डोझो संघटिका मुंबई विभाग यांनी एका पत्रकाद्वारे जाहीर केले .

गजेंद्र डोंगरे साहसिक न्यूज /24 वर्धा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!