दारूबंदी जिल्ह्यात नाकाबंदी; १५० पेट्या देशी दारू जप्त.! २२ लाखांचा मुद्देमाल हस्तगत…

0

🔥दारूबंदी जिल्ह्यात नाकाबंदी; १५० पेट्या देशी दारू जप्त.! २२ लाखांचा मुद्देमाल हस्तगत.

वर्धा -/ येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवैध दारू व्यवसाया विरोधात मोठी धडक कारवाई करीत नाकाबंदी दरम्यान देशी दारूने भरलेल्या १५० पेट्या, चारचाकी वाहन, रोख रक्कम व मोबाईल असा एकूण २२ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी एका आरोपीस अटक करण्यात आली असून पुरवठादाराचाही शोध सुरू आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पथक काल ता. 21 जानेवारी रोजी सावंगी(मेघे) पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना मुखबिराकडून मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार राहुल प्रकाश पवार हा त्याच्या ताब्यातील बोलेरो पिकअप (क्रमांक MH 52 0026) या चारचाकी वाहनातून तुळजापूर हायवे मार्गे वर्ध्याकडे देशी दारूचा साठा घेऊन येत असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली.
सदर माहितीच्या आधारे पोलिसांनी पंछी ढाब्याजवळ नाकाबंदी केली. यावेळी संशयित वाहनाची पंचासमक्ष झडती घेतली असता वाहनामध्ये रॉकेट संत्रा कंपनीच्या ९० मि.ली. क्षमतेच्या १५ हजार रुपयांच्या देशी दारूने भरलेल्या १५० खरड्यांच्या पेट्या, रोख रक्कम व मोबाईल आढळून आला. हा सर्व मुद्देमाल पंचासमक्ष जप्त करण्यात आला.
यावेळी चौकशीदरम्यान आरोपी राहुल पवार याने सदर दारूचा साठा भूषण पाटील, रा. मुकटी, जि. धुळे याच्याकडून मिळाल्याचे सांगितले. त्यानुसार दोन्ही आरोपींविरुद्ध सावंगी(मेघे) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल व अप्पर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद चौधरी, पोलीस उपनिरीक्षक प्रकाश लसूंते तसेच पोलीस अंमलदार शेखर डोंगरे, विकास मुंडे, सुगम चौधरी, शुभम राऊत व राहुल लुटे यांनी केली.

ब्युरो रिपोर्ट साहसिक News-/24 वर्धा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!