वर्धा -/ जय महाराष्ट्र युवा संघटन तर्फे वर्धा जिल्ह्यामध्ये 50 वर्ष पूर्ण झालेल्या दारूबंदी कायद्यामुळे काय फायदे झाले आहे .हे विचारण्यासाठी बुधवार दिनांक 4 सप्टेंबर रोजी विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात घंटानाद आंदोलन करण्यात आले. यावेळी वर्धा जिल्ह्यामध्ये दारूबंदी कायद्यामुळे 2014 ते जून 2024 पर्यंत 3,91,657 लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले, यापैकी दारू विक्री गुन्ह्यामध्ये फक्त 307 लोकांनवर गुन्हा सिद्ध झाला असून दारू पिणाऱ्यांवर 6473 लोकांवर गुन्हा दाखल झाला आहे .तसेच 174,16,17,566/- रुपयाची दारू या दहा वर्षाच्या कालावधीमध्ये पकडण्यात आली यावेळी या सर्वांवर पोलीस यंत्रणा व न्यायालयीन यंत्रणेवर झालेला पगाराचा खर्च तपासला जावा. मात्र ,पोलीस यंत्रणा व न्याय यंत्रणेवर कामाचा वाढलेला भार यावर आंदोलनाच्या माध्यमातून दारूबंदी कायद्याच्या बाबतीत सरकारने एक चौकशी समिती बसविण्याचे आवाहन जय महाराष्ट्र युवा संघटनेचे अध्यक्ष निखिल सातपुते यांनी केले महात्मा गांधीजींच्या नावाने वर्धा जिल्ह्याची ओळख ही आंतरराष्ट्रीय पातळीवर असून त्या प्रमाणात जिल्ह्यामध्ये पर्यटन व्यवसाय मोठ्या प्रमाणात उभा होऊ शकला नाही असे मत माळी समाजाचे नेते पवन तिजारे यांनी व्यक्त केले.यावेळी प्रमुख मागण्या शासनाकडे निवेदनाद्वारे करण्यात आल्या 1) वर्धा जिल्ह्यातील सर्व एमआयडीसीचा विकास शासनाने करून या जिल्ह्यामध्ये रोजगाराच्या नवीन संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून देण्यात याव्या.2) महात्मा गांधीजींच्या नावाची आणि विचारांची होत असलेली थट्टा या दारूबंदी कायद्याचे फायदे तपासून थांबवावी.3)वर्धा तालुक्यातील एमआयडीसी सेवाग्राम दवाखान्यामुळे व आश्रमामुळे प्रदूषणाची कारणे देऊन मोठा रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या प्रकल्पांना परवानगी दिली जात नसल्यामुळे वर्धा तालुक्यातील एमआयडीसी ही हिंगणघाट/यवतमाळ रोड या भागात स्थलांतरित करण्यात यावी व या जिल्ह्यातील बेरोजगार तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्यावा 4) शासनाच्या शासकीय नोकऱ्यांमध्ये वर्धा जिल्ह्यातील बेरोजगार तरुणांना राखीव कोठा देऊन खऱ्या अर्थानं गांधी जिल्ह्याचा सन्मान केला जावा अशा इत्यादी प्रमुख मागण्या जय महाराष्ट्र युवा संघटनेतर्फे राज्य सरकारकडे करण्यात आल्या.यावेळी या आंदोलनाला महात्मा फुले प्रतिष्ठान चे अध्यक्ष पवन तिजारे, छत्रपतींचे मावळे या संघटनेचे अध्यक्ष अमोल अतकर, बहुजन समाजवादी पार्टीचे जिल्हा परिषद सदस्य मनीष पुसाटे यांनी आपला पाठिंबा दर्शविला तसेच या आंदोलनाला मंगेश भोंगाडे, भाजपा नेते किशोर बोकडे, सुशील शिरे, स्वप्निल डांगट, किशोर बाहे, माजी सैनिक श्यामभाऊ परसोडकर, युवा उद्योजक मिलिंद गांधी, अशोक भिवगडे, राहुल गोल्हर, शुभम सातपुते, शिवसेना तालुकाप्रमुख संजय पांडे, दीपक राऊत, सचिन भोयर, प्रफुल लोही, रितेश चौधरी, मुकेश गावंडे, सुशांत जीवतोडे, जनार्दन तीमांडे, सिताराम म्हात्रे, सतीश बोरसरे, पंकज डाके, अभय चौधरी, राजेश बोरेकर, लक्ष्मण मोरे, बालकदास थुल, अनिल गोहाने, ईश्वर डोळसकर, सुनील उमाटे, अभिजीत हेडाऊ, आकाश कछवाह, गणेश दुर्वे, गणेश पाटमासे, नंदू पोहरे, नितीन आकरे, मिलिंद मुडे, धर्मराज वैद्य, प्रसाद पोटदुखे, युवराज वैद्य, सुरेश देठे, अमोल रामटेके, अजय झांबरे, प्रसाद दोडके, प्रोफेसर बावणे, हेमंत भवरे, अनिल बिसेन, हर्षल व्यास, पिंटू मुडे, योगेश चौधरी व इत्यादी नागरिक आंदोलनाला उपस्थित होते.