दिव्यांग व गोरगरीबांच्या कल्याणासाठी डॉ.संतोष मुंडे यांचे कार्य अद्वितीय- मुख्य अभियंता मोहन आव्हाड
प्रतिनिधी / परळी वैजनाथ :
महाराष्ट्रातील दिव्यांगाचे अनेक प्रश्न असुन या प्रश्नांची सोडवणुक करण्यासाठी डॉ.संतोष मुंडे हे सतत कार्यरत असतात दिव्यांग व गोरगरीबांच्या कल्याणासाठी त्यांचे कार्य हे अद्वितीय असल्याचे प्रतिपादन परळी औष्णीक वीज निर्मिती केंद्राचे मुख्य अभियंता मोहन आव्हाड यांनी केले. दिव्यांग बांधवांनी शासनाच्या विविध योजनेचा लाभ घ्यावा असे प्रतिपादन उपजिल्हाधिकारी नम्रता चाटे यांनी बोलताना व्यक्त केले आहे.
शहरातील श्रीनाथ हाँस्पीटल येथे जागतिक दिव्यांग दिनानिमित्त मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता मोहन आव्हाड यांच्या हस्ते व तहसिलदार सुरेश शेजुळ यांच्या उपस्थितीत शिबीराचे उद्घाटन करण्यात आले. या शिबिराचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष व धनंजय मुंडे आरोग्य मित्र योजनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. संतोष मुंडे यांनी आयोजन केले होते.या शिबीरात ४३० जणांची तपासणी करण्यात आली.यावेळी नायब तहसीलदार बाबुराव रूपनर, सुभाष वाघमारे, राजू लव्हारे व तज्ञ डॉक्टर उपस्थित होते. नेत्र तपासणीसाठी डॉ. सुनील वालेवाडेकर लातूर , डॉ. अभिषेक मुळे बीड, डॉ. अभिषेक धायगुडे बीड तज्ञटीमकडून करण्यात आले. प्रास्ताविकात संयोजक डॉ.संतोष मुंडे यांनी या शिबीराच्या आयोजनामागची भुमिका स्पष्ट करताना सांगितले की आम्ही दिव्यांग व अपंगासाठी सामाजीक न्याय मंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या माध्यमातुन अनेक उपक्रम राबविले तसेच शासनाच्या अनेक योजनांचा हजारो दिव्यांगांना फायदा मिळवुन दिला.यापुढेही असेच उपक्रम राबवणार असल्याचे सांगितले.या शिबीरास उपजिल्हाधिकारी नम्रता चाटे यांनी भेट देवुन संयोजकांचे कौतुक केले.शिबिरामध्ये नामवंत नेत्रतज्ञ डॉक्टरांकडून डोळ्यांची नवीन तंत्रज्ञान वापरून काँम्प्युटराईज्ड आधुनिक पद्धतीने तपासणी केली.तसेच, डोळ्यांच्या वेगवेगळ्या आजारांबाबत तज्ञांकडून मार्गदर्शन केले.यामध्ये,डोळे येणे म्हणजे अचानक डोळयांची जळजळ, दुखणे, पाणी व घाण येणे, पापण्या चिकटणे व प्रकाश सहन न होणे. मोतीबिंदू तपासणी करण्यात आली. तसेच डोळ्यांची निगा कशी राखावी असे मार्गदर्शन तज्ञ डॉक्टरांनी केले आहे. यावेळी बोलताना तहसिलदार सुरेश शेजुळ म्हणाले की दिव्यांगासाठी शासनाच्या अनेक योजना असुन या योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. दरम्यान परळी उपजिल्हाधिकारी नम्रता चाटे मँडम म्हणाल्या की, दिव्यांग बांधवांनी शासनाच्या योजनेचा लाभ घ्यावा व कुठल्याही अडचण झाल्यास त्या सोडवण्यासाठी कटिबद्ध व डॉ.संतोष मुंडे यांनी घेतलेले शिबीर कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी रंजीत रायभोळे, साजन लोहिया, महेमुद खान, शेख हिरा, विशाल चव्हान, जालिंदर माने, सुरेश माने, संजय नखाते, दत्तात्रय काटे, संतोष आघाव, सुनिता कवले, अनंतराव लोखंडे, केशव फड, बाळु चव्हाण, विश्वजित मुंडे, नंदकुमार जोशी व इतर दिव्यांग बांधव उपस्थित होते.कार्यकर्माचे सुत्रसंचालन काळे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन सौळंके यांनी केले.