दुचाकीची उभ्या ट्रकला धडक एकाचा मूत्यू तर एक जखमी……

0

अपघातामध्ये मृतक लक्ष्मीकांत उर्फ मयूर चंद्रकांत वाणी रा.देवळी 

  देवळी -/ येथिल लक्ष्मीकांत उर्फ मयूर चद्रकांत वाणी व त्यांचा मित्र हर्षल प्रवीण कापसे हे दोघेही वर्धेवरून देवळी येथे परत येत असतांना मंगळवारी ८ वाजता सुमारास सालोड समोरील जिवो पेट्रोल पंप जवळ उभ्या असलेल्या ट्रकला वाणी व. कापसे यांच्या दुचाकीने धडक दिल्याने अपघात होवून लक्ष्मीकांत उर्फ मयूर वाणी यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने युवकाचा मुत्यू झाला व हर्षल प्रवीण कापसे हा युवक जखमी झाला असून त्याला सावंगी रुग्नालय येथे भरती करण्यात आले आहे.लक्ष्मीकांत उर्फ मयूर वाणी हा युवक सालोड येथिल संत चावरा शाळेमध्ये शिकत होता.लक्ष्मीकांत उर्फ मयूर वाणी व.कापसे आपल्या दुचाकीने… क्रमांक MH32 AD2694 काही कामाकरीता सावंगी येथे गेले होते.परत येताना पाऊस सुरु असल्याने त्यांना उभ्या असलेला ट्रक . ट्रक क्रमांक MH. 29.T1469 हा ट्रक दिसला नाही त्यामुळे या दुचाकी ची धडक बसल्याने अपघात झाला.आज दुपारी यशोदा नदीवर त्यांच्यावर अत्यसंस्कार करण्यात आला असुन यामुळे गावामधे हळहळ व्यक्त होत आहे.

सागर झोरे साहसिक news -/24 देवळी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!