🔥वानराच्या त्रासामुळे शेतकऱ्यांनी वनविभागाला केली बंदोबस्ताची मागणी.
वर्धा,सेलू -/ तालुक्यात दिवसेंदिवस वानरांच्या संखेत प्रचंड वाढ होत असून उपद्रवी वानर दिवसातून शेती पिकाचे नुकसान नासधूस हा त्यांचा आवडीचा विषय आहे .या मुळे आजघडीला शेतकरी ञस्त दिसून येत आहे. शेतकऱ्यांना रोजनिशी पाण्यापावसातही शेती पिके राखण्यासाठी जावेचं लागते. एखाद्या दिवशी समजा जाण झाले नाही तर शेतात नासधूस ठरलेलीच अशातच तुळजापूर येथील शिव हनुमान मंदिराच्या परिसरातील झाडावर राञी वानरांचा मुक्काम हा ठरलेलाच असतो.
नुकताच जयपूर येथील युवक अक्षय गजानन फूलझेले वय ( २९) वर्ष हा तरुण शेतकरी युवक तालूक्याच्या ठिकाणी सकाळी जात असताना सेलू रोडवरील फाटका पासून थोड्याच अंतरावर अचानक रोड लगतच्या बाभूळ च्या झाडावरील असलेल्या वानराने बाईक वर उडी घेतली आणि चालक अक्षय फुलझले रोडवर पडून हात,पाय व डोक्याला जोरदार मार लागला असता मागून येणाऱ्या अॉटोचालकाने अक्षय ला तातडीने सेलू येथे उपचार केला.मात्र,असे बरेच प्रकार घडले असून शासनाने वन विभागाने सर्व वानरांचा बंदोबस्त करावा.असी शेतकरी ,शेतमजूर, विद्यार्थी व वाहनचालकांची मागणी आहे.