🔥देऊळघाट जवळ फर्निचर दुकानावर बुलडाणा वन विभागाची धाड, 1.50 लाखांचा मुद्देमाल जप्त, सागवन तस्करां मध्ये भीतीचे वातावरण
बुलढाणा -/बुलडाणा तालुक्यात अनेक ठिकाणी फर्निचर दुकाना सुरू असून काही जण अवैधपणे सागवनचा फर्निचर तयार करून विक्री करीत आहे. देऊळघाट येथे आज 4 फेब्रुवारी रोजी बुलडाणा वन विभागाच्या पथकाने धाड टाकून विना परवानगी कापलेला सागवन व रंधा मशीन असा एकूण दीड लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलं आहे. या कारवाईमुळे परिसरातील सागवान तस्करामध्ये भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे.
बुलडाणा डीएफओ सरोज गवस यांना माहिती मिळाली की बुलडाणा तालुक्यातील देऊळघाट परिसरातील बिरसिंहपूर रोडवर रमेश नाना बोराळे वय 62 वर्ष यांनी अवैध साग लाकडाची साठवणूक करून फर्निचर दुकाना जवळ लपवून ठेवले आहे. माहिती मिळाल्यावरून बुलडाणा आरएफओ सुनील वाकोडे यांनी तात्काळ घटनास्थळी पथक रवाना केले असता त्या ठिकाणी एक रंधा मशीन गोल साग लाकडे, चौरस लाकडे असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईत अंदाजे दीड लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून. फर्निचर दुकान मालक रमेश बोराळे विरुद्ध वन गुन्हा दाखल करण्यात आलं आहे. सदर कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात बुलडाणा वनपाल प्रदीप मुंढे, वनरक्षक कु.एस.बी. कराड, वनरक्षक समाधान झोटे, चालक संदीप मडावी, प्रवीण सोनवणे, पवन वाघ, दीपक सोनवणे, रवींद्र तायडे यांनी पार पाडली