🔥देवळीत महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे उदघाटन आज.
🔥पहलवानांच्या कुस्ती स्पर्धेसाठी देवळी नगरी सज्य.
देवळी -/ माजी खासदार रामदास तडस यांच्या वाढदिवसानिमित्त देवळीत भव्य ग्रीकोरमन महाराष्ट्र केसरी किताब राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचे उदघाटन आज होणार असून देवळी नगरी कुस्तीचा जल्लोषात रंगण्यास सज्ज झाले आहे.
भारतीय कुस्तीगीर संघ संलग्न महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने वर्धा जिल्हा कुस्तीगीर संघ व सार्वजनिक बजरंग व्यायाम शाळा, देवळी यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 31 मार्च ते 1 एप्रिल दरम्यान ग्रीकोरोमन प्रकारातील ही प्रतिष्ठेची स्पर्धा रंगणार आहे.
खा. रामदास तडस इनडोअर स्टेडियम,स्व. दत्ता मेघे क्रीडा नगरी या स्पर्धेसाठी आकर्षक सजली असून, स्पर्धा दोन मॅटवर खेळविण्यात येणार आहेत. स्टेडियममध्ये आधुनिक सुविधा उभारण्यात आल्या असून, प्रेक्षकांसाठी बसण्याची व्यवस्था, आणि शहरात ठिकठिकाणी स्वागत कमानी आणि सामन्यांचा थरार पाहण्यासाठी मोठ्या एलईडी स्क्रीनचीही सोय करण्यात आली आहे.देवळी शहरात ठिकठिकाणी स्वागत कमानी, स्वागत बॅनर लावण्यात आले आहे कुस्ती सामन्यांचा थरार पाहण्या करिता देवळीकर आतूर झाले आहे.
या स्पर्धेत महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांतील तब्बल 42 संघ आणि सुमारे 400 मल्लांचे आगमन देवळी शहरात झाले असून उद्घाटनापूर्वी 36 जिल्ह्यातून आलेले मल्ल आपल्या जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करीत देवळी शहरातून मिरवणूक काढून स्टेडियमवर पोहोचून स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामांकित खेळाडूंचा सहभाग या स्पर्धेचे आकर्षण ठरणार आहे.
स्पर्धेचे उद्घाटन दि. 31 मार्च 2026 रोजी सायं. 7 वाजता पार पडणार असून, माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते तर अध्यक्षस्थानी हिंगणघाटचे आमदार समीर कुणावार राहणार असून,स्वागतध्यक्ष देवळीचे आमदार राजेश बकाने,स्पर्धेचे आयोजक मा. खा. रामदास तडस आ. दादाराव केचे, नगराध्यक्ष किरण ठाकरे,उपाध्यक्ष राहुल चोपडा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या सोहळ्याची जय्यत तयारी पूर्ण झाली असून, आयोजक रामदास तडस स्वतः स्पर्धा स्थळी उपस्थित राहून तयारीचा आढावा घेत आहेत. स्वागताध्यक्ष आमदार राजेश बकाने यांनीही नियोजनाची पाहणी केली आहे.
देवळी व परिसरातील कुस्तीप्रेमींची उत्सुकता शिगेला पोहोचली असून, महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा थरार अनुभवण्यासाठी शहर सज्ज झाले आहे.
या स्पर्धेच्या आयोजना करिता उमेश कामडी, रवींद्र करोटकर, शुभांगी कुर्जेकर, सौरभ कडू, अंकित टेकाडे, शुभम तरेकर, प्रकाश करोटकर, विजय गोमासे इत्यादी परिश्रम घेत आहे.