🔥खाते केवायसी व आधार लिंक साठी ग्राहक घालत आहे चकरा.🔥महाराष्ट्र बँकेतील अधिकारी सुस्त व ग्राहक मात्र त्रस्त.
देवळी -/तील बँक ऑफ महाराष्ट्राचा भोंगळ कारभारामुळे ग्राहक त्रस्त झालेले आहे.त्यामुळे ग्राहकांना बँक मध्ये अनेक चकरा मारून सुद्धा त्यांचे काम होत नाही आणि बँक अधिकारी उडवा उडवी चे उत्तरे देऊन ग्राहकांना परत पाठवत आहे.त्यामुळे बँक ग्राहकांमध्ये असंतोषाचे वातावरण पसरले आहे.बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये तेथील खातेधारकांना केवायसी करण्यासाठी तसेच खात्याला आधार कार्ड लिंक करण्यासाठी बँकेमध्ये एक महिन्यापासून चकरा माराव्या लागत आहे.कधी बँक अधिकारी म्हणतात तुमची केवायसी झाली तर कधी म्हणतात तुमची केवायसी झाली होती परंतु ते रिजेक्ट झाली आता तुम्हाला पुन्हा केवायसी साठी फॉर्म भरावे लागेल परत तेच उत्तर खात्याला आधार कार्ड लिंक करण्यासाठी देतात एक तर देवळीतील बँक ऑफ महाराष्ट्राची शाखा तिसऱ्या मजल्यावर आहे त्यामुळे वयोवृद्ध नागरिक आजारी तसेच दिव्यांग ग्राहकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे.त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या ग्राहकांमध्ये असंतोषाचे वातावरण पसरले आहे.आधीच लाडकी बहीण योजनेमुळे या महाराष्ट्र बँक मध्ये जास्तीत जास्त महिलांनी आपले खाते उघडले आहे आणि जोपर्यंत या खात्याला केवायसी आणि आधार लिंक होणार नाही तोपर्यंत खात्यामध्ये पैसे जमा होणार नाही त्यामुळे मजूर व काम करी महिला आपल्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाले की नाही हे बघण्याकरिता दररोज आपले काम सोडून तीन मजली वर बँक मध्ये चढत आहे.आणि एका महिन्यापासून त्यांचे आधार कार्ड व केवायसी लिंक होत नसल्याने त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा कुठून होणार? परंतु शासनाचे स्पष्ट आदेश असून सुद्धा ग्राहकांचे काम त्वरित करून द्यावे तरीही बँक अधिकारी आपल्या मन मर्जी कारभाराणे शासन आदेशाची खिल्ली उडवत आहे.वरूनच लिंक फेल आहे तर आम्ही काय करू असे उडवा उडवीचे उत्तरे देऊन रोज शेकडो ग्राहकांना घरी परत पाठवत आहे.शासनाने अशा मुजोर दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करून बँक ग्राहकांना होणारा त्रास टाळावा अशी मागणी बँक मध्ये येणारे महिला व पुरुष ग्राहक करीत आहे.तरी शासनाने याकडे लक्ष देऊन लोकांच्या समस्या त्वरित दूर कराव्या अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.आमचा भाऊ लाडक्या बहिणीचा होणारा त्रास लवकरात लवकर कमी करतील का असा प्रश्न आता महिला बँक कर्मचाऱ्यांना विचारत आहे.