देवळी तालुक्यात पुन्हा सरसावले रेती तस्कर…

0

🔥प्रशासकिय अधिकाऱ्यांची डोळेझाक,राजकिय लोकांची साटेलोटे.🔥लाखो रुपयाचा महसूल विभागाला फटका.

देवळी / तालुक्यात रेती तस्करीचा धंदा जोरात सुरु असून दररोज महसूल विभागाचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे.याकडे जिल्हा प्रशासनांचे दुर्लक्ष असून यांचा फायदा रेती तस्कर घेत आहे.तालुक्यातील आंजी-अंदोरी, सातीपोटी,शिरपूर होरे,खर्डा,रोहनी,तांबा,कांदेगाव,आपटी, गुंजखेडा,रोहना या गावा जवळील वर्धा नदीच्या-तसेच यशोदा नदीवरील सोनेगाव बाई,टाकळी दरणे , सरुळघाट,तसेच भदाडी नदीवरील निमगाव,पडेगाव चिकणी,जामणी,वडद या भागातून,मोठ्या प्रमाणात रेतीचे उत्खनन करून चढ्या भावाने रेती तस्कर रेती चा व्यवसाय करीत आहे. रेतीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात फोफावला असून रेतीचे दर २५ हजार रुपये टिपर ४०० फूट, टॅक्टर १५० फूट. १०००० रुपये या भावाने बांधकाम करणाऱ्या नांगरीकाना विकत आहे.लोकसभा निवडणूकीया च्या काळामध्ये महसूल अधिकारी व पोलिस अधिकारी यांचे पाहणी पथक फिरत असल्यांने,त्यावेळी रेती थाप्यावर कारवाई करण्यात आली झालेल्या कारवाईबाबत अजूनही माहिती प्रसिद्धी माध्यमांना देण्यात आली नाही.निवडणूक संपली आणि अधिकारी कर्मचारी यांनी रेती थाप्या कडे दुर्लक्ष केल्यामुळे रेती तस्करी मोठ्या जोमात सुरु आहे. रेती तस्करी व्यवसायामध्ये गावागावातील राजकीय पक्षांचे कार्यकर्ता व पदाधिकारी यांची रेती तस्करां न बरोबर साठगाठ असल्याची सर्वत्र चर्चा आहे. शासन रेती घाट लिलाव न.करता आपले उत्पन्न बुडवींत आहे. गरजू नागरीकांना मोठ्या भावामध्ये तस्कराकडुन रेती विकत घ्यावी लागत आहे.याकडे जिल्हाधिकारी,व.पोलिस अधिक्षक यांनी लक्ष देऊन कारवाई करावी अशी जनतेची मागणी आहे.

सागर झोरे साहसिक न्यूज /24 देवळी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!