देवळी नगर परिषदेत तळमजल्यावर कामकाज आणण्यावरून वाद… अध्यक्षांचे पत्र,तर उपाध्यक्षांची पत्रकार परिषद….

0

🔥देवळी नगर परिषदेत तळमजल्यावर कामकाज आणण्यावरून वाद… अध्यक्षांचे पत्र,तर उपाध्यक्षांची पत्रकार परिषद.🔥देवळी नगरपरिषद मध्ये वादाची ठिणगी अध्यक्षाचा इशारा,तर उपाध्यक्ष चा पलटवार.

देवळी -/ देवळी नगर परिषदेच्या प्रशासकीय इमारतीचा पहिल्या माळ्यावर सुरू असलेले नगरपालिकेचे कामकाज तळमजल्यावर आणण्यात यावे अशी मागणी नगराध्यक्ष किरण ठाकरे यांनी मुख्याधिकारी नेहा आकोडे यांना पत्र देऊन मागणी केली आहे.
नगराध्यक्ष किरण ठाकरे यांनी दिलेल्या पत्रात पहिल्या माळ्यावर असलेले कामकाज तळ माळ्यावर आणण्यात यावे जेणेकरून वयोवृद्ध लोकांना त्रास होणार नाही याची जाणीव ठेवून त्यांनी ही मागणी केली आहे. ही मागणी त्यांची फार जुनी आहे त्यांनी काही वर्षांपूर्वी पहिल्या मजल्यावरचे कामकाज तळमजल्यावर आणण्यासाठी नगरपालिकेसमोर उपोषण सुद्धा केले होते. परंतु त्यांच्या साखळी उपोषणाला यश आले नव्हते. नगराध्यक्षपदी निवडून आल्यावर त्यांनी कामकाज तळमाळ्यावर आणावे ही मागणी रेटून धरली असून येत्या पंधरा दिवसात पहिल्या माळ्यावरील कामकाज तळमळ्यावर जर आले नाही तर आपण नगराध्यक्षाच्या खुर्चीवर न बसता कार्यालयासमोर खाली बसून कामकाज करू असे जाहीर केले आहे.
देवळी नगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाचे १६ आणि २ स्वीकृत सदस्य आहे तसेच काँग्रेस पक्षाची ४ सदस्य आहे ,अध्यक्ष हे अपक्ष निवडून आल्याने मुळे निर्णय घेण्याकरिता भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारावर अवलंबून राहावे लागत आहे त्यामुळे नगरपालिकेच्या सभागृहात निर्णय घेण्यामध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे.
अध्यक्षांनी मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रा बाबत उपाध्यक्ष राहुल चोपडा यांनी आज दि. ११ मार्च बुधवार रोजी साडे अकरा वाजता नगरपरिषद कार्यालय मध्ये पत्रकार परिषद घेऊन अध्यक्ष किरण ठाकरे यांनी दिलेल्या मुख्याधिकारी यांना दिलेल्या पत्राला उत्तर देत सांगितले की नगर अध्यक्षच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पहिल्या आम सभेमध्ये सर्वानुमते लिफ्ट बसवण्याचा प्रस्ताव पास करण्यात आला. जेणेकरून वय वृद्ध नागरिकांना नगरपरिषदेच्या वरच्या मजल्यावर येण्यास कोणताही त्रास होणार नाही याची दखल घेतली यास अध्यक्षांनी सुद्धा सहमती दिली व सर्वानुमते हा प्रस्ताव पारित करण्यात आला. असताना सुद्धा हे सर्व अध्यक्षाच्या सहमतीने झाले असताना सुद्धा त्यांनी मुख्यअधिकाऱ्यांना वरच्या मजल्यावरील कामकाज तळ मजल्यावर पंधरा दिवसात आना नाही तर मी नगर अध्यक्षाच्या खुर्चीवर बसणार नाही नगर परिषद च्या बाहेर बसून नगर परिषदेचा कारभार पाहीन असे पत्र मुख्य अधिकाऱ्यांना दिले हे पत्र मुख्य अधिकाऱ्यांना धमकविणारे असल्याचे न.प उपाध्यक्ष राहुल चोपडा यांनी सांगितले. नगरपरिषद सभागृहाची गरिमा राखली पाहिजे जेव्हा सर्वानुमते ठराव घेण्यात आल्यावर त्यात तेही सहभागी होते मग हे नौटंकी करण्याची आवश्यकता का? अध्यक्षांनी निवडणुकीदरम्यान जनतेसोबत दिलेले खोटी आश्वासने पूर्ण करण्यास ते अपयशी ठरले आहेत त्यामुळे जनतेचे लक्ष भटकविण्यासाठी त्या अशा प्रकारच्या कायदेबाह्य नौटंकी करून जनतेची दिशाभूल करीत आहे. ह्या अध्यक्षपदाला शोभणाऱ्या गोष्टी नाही त्यांनी सभागृहाशी समन्वय साधून जनहितार्थ कार्य करायला पाहिजे.
येत्या दोन महिन्याच्या आत आमदार राजेश बकाने यांच्या निधीतून १८ लक्ष रुपये खर्च करून नगरपरिषद मध्ये लिफ्ट बसवण्यात येणार आहे.असे न. प.उपाध्यक्ष राहुल चोपडा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.घर कर व पाणीपट्टी तसेच घरकुलासाठी जमीन उपलब्ध करून देऊ असे भ्रमक प्रचार करून नगरपरिषद मध्ये जमा होणारा टॅक्स चा पैसा लोकांनी जमा केलेला नाही त्यामुळे देवळी नगरपरिषद वर आर्थिक संकट ओढऊ शकते याला सर्वस्वी जबाबदार अध्यक्ष किरण ठाकरे आहेत असे आरोप या पत्रकार परिषदेत न.प.उपाध्यक्ष राहुल चोपडा यांनी लावले. या पत्रकार परिषद मध्ये उपाध्यक्ष राहुल चोपडा,मनीषा लोखंडे, विभावरी बजाईत,शितल तरेकर, विजय गोमासे, प्रेमेंद्र ढोक,संतोष भोयर,रविंद्र करोटकर, माझी न.प उपाध्यक्ष नरेंद्र मदनकर,विलास जोशी इत्यादींच्या उपस्थितीत पत्रकार परिषद पार पडली.

          सागर झोरे साहसिक       News-/24 देवळी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!