मृतक अमित प्रमोद मातकर व रोशन प्रकाश कामडी रा.देवळी दोन मजुराच्या मृत्यूला कारणीभूत ठरणारी हीच ती(S M W) संगम स्टील इस्पात कंपनी.
🔥प्रकृती बिघडल्याने दाखल केले होते रुग्णालयात.
देवळी -/येथील औद्योगिक वसाहतीतील (S M W) संगम स्टील इस्पात कंपनीच्या दोन कामगारांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. मृतांमध्ये एका अल्पवयीन कामगाराचा समावेश असून घटनेची देवळी पोलिसांनी नोंद घेतली आहे.अमीत प्रमोद मातकर वय (२१) वर्ष रा.वॉर्ड क्र. १३ देवळी व रोषण प्रकाश कामडी वय (१७) वर्ष रा.फुकट नगर, देवळी अशी मृत कामगारांची नावे सांगण्यात येते. शनिवार,२५ मे रोजी अमीत मातकर हे त्यांच्याकडे असलेले काम करीत असताना त्यांची प्रकृती बिघडली.ते भोवळ येत जमिनीवर पडल्याने त्यांना तातडीने सेवाग्राम येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.तेथे उपचार सुरू असताना मंगळवारी अमीतने शेवटचा निरोप घेतला.तसेच रोषण कामडी हा कंत्राटदाराच्या माध्यमातून(S M W) संगम स्टील इस्पात कंपनीत सेवा देत होता.मंगळवारी दिवसभर त्याने कंपनीत काम केले.व प्रवेशद्वाराजवळ तो जमिनीवर कोसळला.उपस्थित कामगारांनी त्याला सावंगी (मेघे) येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.तेथे उपचारादरम्यान रोषणचा मृत्यू झाला.कामगारांच्या मृत्यूची माहिती मिळताच देवळीचे ठाणेदार सार्थक नेहाते व त्यांच्या सहकाऱ्यांनी माहिती जाणून घेतली.रोषण याचा मृतदेह सावंगी रुग्णालय प्रशासनाने शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविल्याचे कळते. उष्माघाताचे बळी?
जिल्ह्यातील उष्णतापमानाचा पारा ४५ अंशावर आहे.अशातच हे दोन्ही कामगार कंपनीमध्ये उष्ण वातावरणात काम करीत राहिले.त्यांना ते उष्णतापमान सहन न झाल्याने भोवळ होऊन पडले व उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.परंतु उष्माघाताचे बळी आहेत,अशी चर्चा सर्वत्र जोरात आहे. कारवाई सुरू आहे : चव्हाण
देवळी औद्योगिक वसाहतीतील (S M W) संगम स्टील इस्पात कंपनीच्या दोन कामगारांचा मृत्यू झाला आहे.या संदर्भात कारवाई सुरू आहे, असे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल चव्हाण यांनी सांगितले.