देवळी येथील केंद्र संचालकाची विद्यार्थ्यास मारहाण…

0

🔥यशवंत कन्या शाळा देवळी परीक्षा केंद्रावरील घटना.🔥केंद्र संचालकाने पोलीस स्टेशनमध्ये दिला लिखित माफीनामा.

🔥शिक्षण विभाग या केंद्र संचालकावर निलंबनाची कारवाई करनार का.?

देवळी -/ येथील आज बुधवार रोजी सकाळी साडेदहा वाजता च्या दरम्यान स्थानिक यशवंत कन्या शाळा परीक्षा केंद्रावर परीक्षा केंद्र संचालक विश्राम पातोंड यांनी दहावीच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थी ओम धनराज झाडे रा.केदार ले आऊट देवळी या विद्यार्थ्याला तू परीक्षा केंद्रावर आला कसा असे बोलून त्याची मागून कॉलर पकडून समोरच्या गेट पर्यंत आणले त्या ठिकाणी उपस्थित गृहरक्ष दलाचे सैनिक व परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे पालक यांच्यासमोर अश्लील शिवीगाळ करून त्या विद्यार्थ्याला मारहाण केली जेव्हा विद्यार्थ्यांनी म्हटले की मी परीक्षा देणारा विद्यार्थी आहे ही बघा माझी हॉल तिकीट तू अगोदर का बरं पहिले नाही दाखविली विद्यार्थ्यांनी रडताना सांगितले की सर तुम्ही अगोदर मला विचारलेच नाही आणि आधीच मारहाण केली ठीक आहे अस म्हणतात पातोंड यांनी आता तू जा आता परीक्षा दे अस म्हणतात विद्यार्थी रडत परीक्षा द्यायला आत मध्ये गेला.

परंतु गेट समोर उपस्थित परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालक वर्गानी केंद्र संचालकांना विचारले तुम्ही या विद्यार्थ्याला का बरं मारहाण केली तुम्हाला या विद्यार्थ्यांचा मारहाण करण्याचा अधिकार काय केंद्र संचालक विश्राम पातोंड या मुजोवर प्रश्न विचारांना अरे रावीने उत्तर दिले व इथून चालते व्हा जे होते ते करा या शब्दात पालकांना हाकलून दिले.
त्यानंतर केंद्र संचालक विश्राम पातोंड परीक्षा केंद्र सोडून गेटच्या बाहेर निघाला व गेटच्या बाहेर उपस्थित असलेल्या काही महिला पालकांसोबत सांगा आता काय करता मारा मला असे उपस्थित विद्यार्थी महिला पालकांसोबत अरे रावीची भाषा बोलू लागला परंतु त्या केंद्रावर उपस्थित गृह रक्षक दलाच्या सैनिकांनी त्या परीक्षा केंद्र संचालकाला जबरीने आत मध्ये पाठवले सर तुम्ही परीक्षा केंद्राच्या बाहेर येऊ नका पेपर सुरू झालेला आहे.असे बोलून केंद्र संचालकाला पकडून आतमध्ये पाठवले.
शेवटी या घटनेची माहिती मारहाण झालेल्या विद्यार्थ्याच्या पालकाला कळली त्यांनी थेट परीक्षा केंद्रावर धाव घेतली आणि पेपर सुटल्यावर बाहेर आपल्या मुलाला विचारणा केली असता काय झाले मुलाने रडू रडू उपस्थित सर्व पालकांसमोर घडलेला प्रकार सविस्तर सांगितला कोणतीही अप्रिय घटना घडू नये म्हणून गृह रक्षक दलाच्या सैनिकांनी तेथून गर्दी कमी केली आणि संतापलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकाने देवळी पोलीस स्टेशन गाठून मुलाला मारहाण झाल्याची मला तक्रार द्यायची आहे असे सांगितले तेव्हा देवळी पोलिसांनी केंद्र संचालक विश्राम पातोंड परीक्षा केंद्रावरून पोलीस स्टेशनला आणले त्यानंतर ठाणेदार च्या कक्षामध्ये दोघांकडून विचारपूस झाली त्यामध्ये सिद्ध झाले की केंद्र संचालक विश्राम पातोंड याने विद्यार्थ्यास मारहाण केली हे सिद्ध झाले. तेव्हा देवळीचे ठाणेदार यांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले परंतु केंद्र संचालक पातोंड यांणे मारहाण झालेल्या विद्यार्थ्याच्या पालकांचे मान धरणी करून लिखित स्वरूपात माफीनामा देतो मला क्षमा करा अशी विनवणी केली तेव्हा पालकांनी तक्रार न देता केंद्र संचालक विश्राम पातोंड लिखित माफीनामा पोलीस स्टेशनला देऊन यापुढे असा कोणताही प्रकार घडणार नाही अशी सर्वांसमोर माफी मागितली. त्यामुळे हा प्रकार पोलीस स्टेशनमध्ये संपला.
परंतु केंद्र संचालक विश्राम पातोंड परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्याला मारहाण करण्याची परवानगी कोणी दिली अशा केंद्र संचालकावर शिक्षण विभाग गटशिक्षणाधिकारी या प्रकरणाची चौकशी करून संबंधितावर निलंबनाची कायदेशीर कारवाई करणार का? याकडे आता सर्व विद्यार्थी पालकांचे लक्ष लागलेले आहे.बघत रहा पुढील भागात सहासिक न्युज -24 मध्ये सविस्तर व्हिडीओ सहित माहिती.

                                (क्रमशः)

सागर झोरे साहसिक NEWS -/24 देवळी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!