देवळी -/महाराष्ट्र शासना द्वारे लाडकी बहीण योजनेच्या घोषणे नंतर या योजनेला संपून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. या योजणेकरीता नारी शक्ति दूत व आता शासनाने लाडकी बहीण योजणेसाठि पोर्टल तयार करून ऑनलाइन अर्ज घेतले जात आहे. या योजनेची माहिती सामान्य महिलांना मिळावी व अर्ज भरतांना महिलांच्या समस्या दूर करन्या करीता महाराष्ट्र शासना द्वारे विधानसभा स्तरावर लाडकी बहीण योजना समिति तयार करण्यात आली . या समितीच्या अध्यक्ष पदी आगरगाव त.देवली येथील माजी सरपंच सौ विभा प्रवीण राऊत यांची नियुक्ती करण्यात आली तसेच या समितीच्या सदस्य पदी शुभांगी कुर्जेकर देवली व नीता हाटेकर पुलगाव यांची नियुक्ती करण्यात आली लाडकी बहीण योजनेतील महिलांना योजनेचा लाभ मिळवून देण्याकरीत या समिति द्वारे मार्गदर्शन व समस्यांचे निवारण करण्यात येईल समितीच्या अध्यक्ष व सदस्यांनी देवली विधानसभा नेते राजुभाऊ बकाने माजी खासदार रामदास तडस जिल्हा अध्यक्ष सुनील गफाट जिल्हा सरचिटणीस राहुल चोपडा यांचे आभार व्यक्त केले तर सर्व महायुतीचे नेत्यानी या नियुक्तीबबत समितीचे अभिनंदन केले.