देवळी -/मागील विधानसभा निवडणुकीत ज्या जागा शिवसेनेने लढल्या होत्या त्या जागांवर आमचा दावा आहे.वरिष्ठ पातळीवर महायुतीच्या नेत्यात याबाबत प्राथमिक चर्चा झाली आहे.राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढील निवडणूक लढवल्या जाणाऱ्या जागांवर निरीक्षक नियुक्त केले आहे.माझी वर्धा जिल्ह्याच्या देवळी विधनासभेकारिता नियुक्ती केली आज या मारदारसंघाचा आढावा घेण्यासाठी आली आहे. असे मत शिंदे गटाच्या नेत्या आमदार भावना गवळी यांनी व्यक्त केले आहे.देवळी येथे आज भावना गवळी यांनी पदाधिकाऱ्यांशी चर्चा करत मतदारसंघाचा आढावा घेतला.यावेळी त्यांनी पत्रकार परिषदेतून संवाद साधला.मागील विधानसभा निवडणुकीत देवळी विधानसभेची जागा ही शिवसेनेच्या वाट्याला आली होती. त्यावेळेस भाजपच्या नेत्याने बंडखोरी करत अपक्ष लढल्याने शिवसेनाच उमेदवारा हा दुसऱ्या क्रमांकावर होता.यामुळे या मतदारसंघात पुन्हा शिंदे गटाने महायुतीत दावा केला आहे.त्या दृष्टीने शिंदे गटाने कामाला सुद्धा सुरवात केली आहे. मतदारसंघात दौरे, पदाधिकाऱ्यांच्या भेटीचे सत्र शिंदे गटाच्या नेत्यांनी सुरु केले आहे.देवळी विधानसभा मतदारसंघात शिंदे गटाकडून माजी राज्यमंत्री अशोक शिंदे व शिंदे गटाचे गणेश ईखार यांनी आपली दावेदारी केली आहे.
देवळीच्या निरीक्षक म्हणून नियुक्त झालेल्या भावना गवळी यांनी आज देवळी येथे भेट देत पदाधिकारी, कार्यकर्ते व स्थानिक नेत्यांशी चर्चा केली.तसेच पत्रकारांशी संवाद देखील साधला.गवळी यांनी देवळीच्या जागेसाठी शिंदे गटाचे नेते माजी राज्य मंत्री अशोक शिंदे इच्छुक असल्याच त्यांनी पत्रकारांना सांगितलंय.सोबतच कोणती जागा सुटणार कोणती नाही याबाबत वरिष्ठ नेते निर्णय घेणार असल्याचही त्यांनी सांगितलंय. या मतदारसंघातील लोकांपर्यंत शिंदे सरकारने केलेली कामे कश्या पद्धतीने पोचतील व सरकारच्या योजनाचा लाभ सामान्य नागरिकांना कसा मिळेल यावर लक्ष देण्याच्या सूचना गवळी यांनी यावेळी कार्यकर्त्यांना केल्या.वर्धा जिल्ह्याच्या चार विधानसभे पैकी एक जागा ही शिंदे गटाने मागितली आहे आणि या जागेसाठी शिंदे गटाकडून तयारी देखील केल्या जातं आहे.आगामी काळात जिल्ह्यात कोणती जागा कोणाच्या वाट्याला जाईल असे आमदार भावना गवळी यांनी त्यावेळी सांगितले. तसेच यावेळी माजी मंत्री अशोक शिंदे माजी जिल्हाप्रमुख राजेश सराप व जिल्हाध्यक्ष गणेश ईखार यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच यावेळी कार्यकर्ते पदाधिकारी यांचा संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता.यावेळी महेश जोशी,सुरेश वैद्य,सुहास कुरटकर,आदी शिवसैनिक कार्यकर्ते उपस्थित होते.