🔥देवळी शहरातील १५ गाईची चोरी.🔥पशुपालकांमध्ये दहशतीचे वातावरण🔥बजरंग दल आक्रमक.
देवळी -/ शहरातील विविध भागांमध्ये १ मार्च पासून दुधारू गाय चोरीचे पंधरा प्रकरणाचे तक्रारी देवळी पोलीस स्टेशनमध्ये नोंदविण्यात आल्या आहे. देवळी नगरपरिषद लेआउट निवासी आशिष मधुकर माहुरे , नरहरी गुलाब कामडी राहणार तुळजाई मंगल कार्यालयाजवळ, मंगल प्रभाकर तलमले ,व शंकर केशवराव कामडी व इतर चोरी गेलेल्या गाईच्या मालकांनी देवळी पोलीस स्टेशन मध्ये तक्रारी नोंदविल्या आहे.
देवळी शहरामध्ये गाई चोरीचे प्रकरण वाढत असल्यामुळे या प्रकरनात देवळी बजरंग दल चे दिनेश शिरसागर यांनी गो..पालकां..सोबत पोलीस स्टेशनमध्ये जाऊन गाई चोरी प्रकरणाची तातडीने चौकशी करण्यात यावी तसेच या गाईचोरी प्रकरणावर बजरंग दलाची नजर आहे या चोरट्यांचा देवळी बजरंग दलाचे कार्यकर्ते शोध लावल्याशिवाय गप्प बसणार नाही असा इशारा दिनेश क्षीरसागर यांनी दिला आहे.
देवळी शहरांमध्ये लाखो रुपये किमतीच्या गाई चोरी चे सत्र चोरट्यांनी राबवून शेतकऱ्यांच्या दुधारू गाई चोरून नेल्यामुळे दहशतीचे वातावरण आहे . देवळी शहरामध्ये मुख्य मुख्य रस्त्यावर सीसीटीव्ही कॅमेरे लावले असून सुद्धा चोट त्यांनी आडमार्गाचा वापर करून गाई चोरून नेण्यात यशस्वी झाले आहे या प्रकरणी देवळी पोलिसांनी कसून तपास करावा व चोरट्याचा शोध घेऊन त्यावर कारवाई करावी अशी गो..पालकांनी तसेच बजरंग दलाने मागणी केली आहे.(क्रमशः)भाग १)