देवळी -/महाविद्यलय विघालय शाळाना सुरुवात झाली असून शहरासह ग्रामीण भागातील मुली शिक्षणाकरीता मोठ्या संख्येने देवळी येथे येतात.ग्रामीण भागातील अंदोरी आंजी वाटखेडा,भिडी,रत्नापूर,नांदोरा डफरे,आगरगाव,सालोड,दहेगाव, इतकेच नव्हेतर वर्धेवरून सुद्धा देवळी येथे शिक्षण घेण्याकरीता येतात.व. देवळी येथिल मुले,मुली वर्धेला इंजिनिअरिंग कॉलेज,औद्योगिक प्रशिक्षण,जे.बी.सायन्स कॉलेज, यशवंत महाविघालय,व.इतर महाविघालयात देवळी वरून वर्धेला एस,टी.बसने जाणे,येणे करतात ग्रामीण भागातील मुली एस.एस.एन. जे.महाविघालयात जाण्याकरीता पायदळ काळापूल मार्ग कॉलेज मध्ये जाणे येणे करतात.या मार्गावर टवाळखोर चिडिमारी करण्याचे मोटर सायकल घेऊन उभे राहतात.काही टवाळखोर,हायवे पुलाच्या खाली, पेट्रोल पंप.या ठिकाणावर उभे राहुन चिडिमारी करत असल्याचे चित्र निदर्शनास येते.त्याच प्रमाणे यशवंत कन्याशाळा,नगर परीषद विद्यालय, जनता विद्यालय येथे जाणाऱ्या विद्यार्थीना इंदिरा गांधीचौक,गांधी चौक,बस स्टेशन चौक,बस स्टेशन परीसर,ज्ञान भारती महाविदयालयाकडे जाणारा सोनेगाव आबाजी रोड या भागावर,चिडिमारी टवाळखोराचे टोळके पाहावयास मिळत आहे.तसेच स्टेडिअम परिसरामध्ये सायंकाळी टवाळखोर टोळके दम मारो दम मारण्याचे चित्र दिसुन येते.या संदर्भामध्ये बऱ्यांच तक्रारी व.चर्चा होऊन सुद्धा कोणीही लक्ष देत नसल्यांचे सांगण्यात येत आहे.या संदर्भामध्ये बऱ्याच तक्रारी व चर्चा होऊन सुद्धा कोणीही लक्ष देत नसल्याचे सांगण्यात येत आहे. दिवसेंदिवस चिडिमारीचे प्रकरण वाढत असल्याने यावर पोलिसांनी त्वरित आळा घालावा. अशी मागणी पालक वर्गानी पत्रकारांन जवळ बोलून दाखवली त्यामुळे दिवसेंदिवस या टवाळखोरांचे टोळीकडे जातीने लक्ष देऊन यांचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी प्रखरतेने जोर धरत आहे.