देवळी शहरामधे पोलिसांचा लॉन्ग मार्च…

0

🔥देवळी शहरामधे पोलिसांचा लॉन्ग मार्च…

देवळी -/ शहरामध्ये गणेश उत्सव व ईद-ए-मिलादुन्नबी च्या निमित्ताने देवळी शहरांमध्ये शांतता व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टिकोनातून पोलीस विभागातर्फे शहरातून मुख्य मार्गाने लॉन्ग मार्च काढण्यात आला.यावेळी इदे मिलादुन्नबी १६ तारखेला व गणेश विसर्जन १६ व १७ तारखेला होत असल्याने शहरामध्ये दोन्ही कार्यक्रम शांततेत पार पडावे याकरिता देवळी पोलीस विभागाच्या वतीने शांतता व सुव्यवस्था राहावी याकरिता आज सकाळी १२ सप्टेंबर रोजी दहा वाजता पोलीस स्टेशन मधून लॉन्ग मार्चला सुरुवात झाली व शहरातील मुख्य मार्गाने फिरून त्या लॉंग मार्च चा समारोप परत पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आला.या लॉंग मार्चमध्ये देवळी चे ठाणेदार महेश चव्हाण यांच्या नेतृत्वात पोलीस विभागातील सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विन गजभिये,डोनेकर,यांच्यासह जमादार, शिपाई,होमगार्ड,व दंगल नियंत्रण पथक,यांचा समावेश होता.

सागर झोरे साहसिक news -/24 देवळी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!