दैनिक साहसिकचे मुख्य संपादक रविंद्र कोटंबकर यांचेवर झालेल्या हल्ल्याचा घाटंजी तालुका पत्रकार संघटना कडून निषेध
प्रतिनिधी / घाटंजी :
दैनिक सहासिकचे मुख्य संपादक रविंद्र कोटंबकर यांचेवर नुकताच वर्धा नागपूर महामार्गावर भ्याड हल्ला करण्यात आला त्या जिवघेण्या हल्ल्यात श्री रविंद्र कोटंबकर यांना मोठी दुखापत झाली आहे. ज्या हल्लेखोरांनी रविंद्र कोटंबकर यांचेवर हल्ला केला त्या हल्लेखोरावर कठोर कार्यवाही करावी अशा आशयाचे निवेदन घाटंजी तालुका पत्रकार संघटने तर्फे घाटंजी येथील तहसीलदारा मार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. उद्धवजी ठाकरे यांच्या कडे एका लेखी निवेदनाद्वारे केली आहे. त्यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात पुढे म्हटले की, आज राज्यात पत्रकार सुरक्षित नाही, पत्रकारांवर रोज हल्ले होत आहेत, परंतु सरकार मात्र या प्रश्नांबाबत सरकार कुठेही गंभीर होताना दिसत नाही. म्हणून भ्रष्टाचारा विरूद्ध रान पेटवणारे दैनिक सहासिकचे मुख्य संपादक श्री रविंद्र कोटंबकर यांचेवर हल्लेखोरांनी भ्याड हल्ला केला. राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून पत्रकारांना असुरक्षित भावनेने जगावे लागत आहे. प्रामाणिक पणे भ्रष्टाचाराची प्रकरणे समाजा समोर आणणे गुन्हा आहे का.? हाच प्रश्न आता पत्रकारिता करणाऱ्या समोर आहे. आज रविंद्र कोटंबकर यांच्यावर हल्ला झाला, उद्या पत्रकारिता करणाऱ्या अनेक लोकांवर हल्ले होतील तेव्हा लोकशाहीचा चौथा स्तंभ गडगडल्या शिवाय रहाणार नाही. पत्रकारांवर होणारे हल्ले सरकारने तात्काळ थांबवावे, पत्रकारांना शासनाने सुरक्षा पुरवावी, तसेच जिवन मरणाची लढाई लढत असलेले दै साहसिकचे मुख्य संपादक रविंद्र कोटंबकर यांना तात्काळ शासनाने सुरक्षा प्रदान करावी अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे. या वेळी तालुका पत्रकार संघटनेचे अध्यक्ष कैलास कोरवते, उपाध्यक्ष कज्जूम कुरेशी, सचिव संतोष अक्कलवार,गणेश भोयर, शेखर पलकंडवार, संजय ढवळे, अमोल नडपेलवार, अमोल मोत्तेलवार, सागर सम्मानवार, बंडु तोडसम, नंदकिशोर डंभारे, संतोष पोटपिल्लेवार, अरविंद चौधरी, सचिव कर्णेवार, अरविंद जाधव,व सर्व पत्रकार बांधव उपस्थित होते