दै.साहसिक ची बातमी प्रकाशित होताच अखेर ‘त्या’ २० शेतकऱ्यांच्या मोटारपंपाचा वीजपुरवठा सुरू….

0

देवळी -/ वीजवितरण कंपनीचे जनित्र नादुरुस्त असल्याने तब्बल दहा दिवस २० शेतकऱ्यांच्या मोटारपंपाचा विद्युत पुरवठा ठप्प झाला होता.मात्र दै.साहसिक न्यूज-24 ची बातमी प्रकाशित होताच वीजवितरण कंपनीच्या संबंधित कार्यालयाने दखल घेत वीजपुरवठा सुरळीत केल्याने शेतकरी आनंदीत झाले.ईसापूर येथे कापसे जनित्र असून त्यावरुन परिसरातील २० शेतकऱ्यांच्या शेतातील मोटारपंपाचा विद्युतपुरवठा आहे. परंतु जनित्र नादुरुस्त असल्याने तेथील वीजपुरवठा खंडीत झाला होता.त्यामुळे शेतकऱ्यांच्या ओलीताचा प्रश्न निर्माण झाला होता.तसेच या जनित्रातील ग्रीफा फुटल्याने फेज जोडता येत नव्हते. परिणामी एखाद्यादिवशी धोका संभवण्याची भिती व्यक्त होत होती.यातच वारंवार वीजपुरवठा खंडीत होत असल्याने पंपसुद्धा बंद पडत होते. पाऊस नसल्याने पिकांना पाणी देणे गरजेचे असताना वीजपुरवठा बंद असल्यामुळे शेतकऱ्यांची पंचाईत झाली होती. या संदर्भात वारंवार तक्रार करूनही उपाययोजना होत नव्हती.अखेर या संदर्भात दै. साहसिक न्यूज-24 मध्ये बातमी प्रकाशित करताच वीजतवरणने दखल घेत नवीन ग्रीफा टाकून दुसऱ्याच दिवशी वीजपुरवठा सुरळीत केला. त्यामुळे शेतकरी शामराव करपती, शंकर भोयर,पप्पू सुपलकर, मधूकर शेंडे, शरद रोडे, बाबा गलांडे व इतर शेतकरी आंनदित होऊन दै.साहसिक न्यूज- 24’चे आभार मानले.

सागर झोरे साहसिक news -/24 देवळी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!