(धक्कादायक घटना)संकट मोचन परिसरात पुन्हा खूनाची घटना,यवतमाळ शहर पुन्हा हादरलं….!

0

🔥(धक्कादायक घटना)संकट मोचन परिसरात पुन्हा खूनाची घटना,यवतमाळ शहर पुन्हा हादरलं….! मृतक सुरज गाताडे  वय २१ वर्ष 

यवतमाळ -/ शहरात पुन्हा एकदा खूनाची थरारक घटना समोर आली आहे. संकट मोचन परिसरात २१ वर्षीय सुरज गाताडे या युवकाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. ही घटना मंगळवारी रात्री सुमारे ९.४५ वाजता जगत मंदीर परिसरात घडली. अवघ्या दोन दिवसांमध्ये शहरात घडलेली ही दुसरी हत्या असून, यवतमाळ शहरात भीतीचे सावट अधिक गडद झाले आहे.सुरज गाताडे हा युवक नगरपरिषदेच्या घंटागाडीवर सहायक म्हणून काम करत होता. नेहमीप्रमाणे आपले काम संपवून घरी परतत असताना त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. घटनेची माहिती मिळताच त्याचे आई-वडील घटनास्थळी पोहोचले. त्यांनी सुरजला रक्ताच्या थारोळ्यात पडलेले पाहिले आणि तातडीने यवतमाळ मेडिकल कॉलेजमध्ये नेले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.घटनेनंतर यवतमाळ पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अप्पर अधीक्षक पियुष जगताप, उपविभागीय अधिकारी दिनेश बैसाणे तसेच अवधूतवाडी पोलिस ठाण्याचे ठाणेदार नरेश रणधीर हे स्वतः घटनास्थळी दाखल झाले. परिसरात तातडीने मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच कमांडो पथकाचीही मदत घेण्यात आली आहे.या घटनेपूर्वीच दोन दिवसांपूर्वी चांदणी चौक परिसरात मनीष शेंद्रे नावाच्या युवकाची हत्या झाली होती. त्या प्रकरणात पोलिसांनी पाच आरोपी व एका विधी संघर्ष बालकास अटक केली होती. हे प्रकरण शांत होण्याआधीच दुसऱ्या खुनाने शहर हादरून गेले आहे.शहरात वाढती गुन्हेगारी आणि पोलिसांपुढील आव्हाने :या सलग घडणाऱ्या खुनाच्या घटनांमुळे यवतमाळ शहर गुन्हेगारीच्या दृष्टीने कुप्रसिद्ध होत चालले आहे. शहरात सामान्य नागरिक भयभीत झाले असून, “कधी कोण बळी जाईल?” या प्रश्नाने अनेकांना झोप उडाली आहे. संपूर्ण समाजमन हादरले असून, यावर प्रशासनाने कठोर आणि ठोस पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे.

🔥जनतेची मागणी – कायदा व सुव्यवस्थेची कडक अंमलबजावणी करा!
या घटनांनंतर शहरातील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. पोलिस प्रशासनाने या हत्येचा तपास तातडीने करून दोषींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. एकामागून एक खूनाच्या घटना घडत असताना पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

या घटनेचा तपास युद्धपातळीवर सुरू असून, लवकरच आरोपींचा छडा लावण्यात येईल, अशी माहिती पोलिस सूत्रांकडून देण्यात आली आहे.

🔻 संपूर्ण यवतमाळकरांचे एकच मागणे – आम्हाला सुरक्षिततेची हमी द्या! 🔻

दीपक यंगड साहसिक News-/24 यवतमाळ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!