🔥धक्कादायक घटना,समृध्दी महामार्गावरील अपघात चारचाकी वाहन पलटी झाल्याने एक ठार,तर तीन जण जखमी.
सेलू -/ समृध्दी महामार्गावर सेलू नजीक रमण्याजवळ टवेरा गाडी पलटी झाल्याने झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार तर तीन जण जखमी झाल्याची घटना रविवारी दुपारी 4.20 वाजताचे सुमारास घडली लक्ष्मण शामराव कोबे वय 50 रा नागपूर असे यातील मृत व्यक्तीचे नाव आहे.
नागपूर येथून आर्वी येथे जात असताना समृध्दी महामार्गावर सेलू नजीक रमण्याजवळ टवेरा चारचाकी वाहन क्रमांक एम एच 31 ईयु 9747 हे पलटी झाले चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने टवेरा गाडी रस्त्याचे कडेला जाऊन आदळली व पलटी झाली यात वाहनातील एकाला जबर मार लागल्याने त्याचा घटनास्थळी मृत्यू झाला तर इतर तिन जण जखमी झाले आहेत जखमीमध्ये सुरेश शंकर ठाकरे वय 58 रा कॉ हिंगणघाट ,नरेश मारोती ठाकरे वय 45 नागपूर ,आशीष महल्ले वय 38 नागपूर यांचा समावेश आहे घटनेची माहिती मिळताच रुग्णमित्र प्रज्वल लटारे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना आपल्या रुग्णवाहिकेद्वारे उपचारासाठी दाखल केले पोलीसांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेचा पंचनामा केला याप्रकरणी पुढील तपास सेलू पोलीस करीत आहे.