🔥तालुका क्रीडा अधिकारी अनिल बोरवार.🔥जिल्हा क्रीडा अधिकारी व उपसंचालक पल्लवी धात्रक🔥28/02/2022 चे चौकशीचे पत्र
🔥धक्कादायक! हिंगणा तालुका क्रीडा संकुल बनला शोभेची वास्तु!सोळा वर्ष झाले तरी हिंगणा क्रीडा संकुल ची कामे अपूर्ण!
हिंगणा -/ गाव खेड्यातील खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे म्हणून शासनातर्फे सर्व तालुकास्तरावर क्रीडा संकुल तयार करण्यात आले. हिंगणा तालुक्यातही क्रीडा संकुलाच्या बांधकामासाठी एक करोडचा निधी मिळाला होता. यातील पहिल्या टप्प्यात ते एक करोड पूर्ण वापरूनही बाकी काम अर्धवट सोडण्यात आले होते. हिंगणा तालुका क्रीडा समितीने शासनाला पुन्हा पत्र पाठवून पाच करोडची मागणी केली होती, या पाच करोड पैसा वापरूनही अद्यापही हिंगणा तालुका क्रीडा संकुलाचे काम अपूर्णच आहे. उर्वरित कामे झालीच नसल्याचे हे अर्धवट क्रीडा संकुल निव्वळ शोभेची वास्तू बनली आहे. दरम्यान येथील सामाजिक कार्यकर्ते व पत्रकारांनी माहिती अधिकारांतर्गत ही बाब चव्हाट्यावर आणली आहे. हिंगणा तालुका क्रीडा संकुल समितीने मिळालेल्या एक करोडचा हिशेब द्यावा. अशी मागणी ही त्यांनी केली आहे. पण ज्या उद्देशाने शासनाने क्रीडा संकुलासाठी निधी दिला तो उद्देश अपूर्ण असल्याने येथील क्रीडा प्रेमींची घोर निराशा होत आहे.
2013 मध्ये हिंगणा तालुका क्रीडा संकुल स्थापन करण्यात आली होती. पण या हिंगणा क्रीडा संकुल समितीतर्फे क्रीडा संकुलासाठी मिळालेल्या लाखोंचा निधीचा गैरव्यवहार करण्यात आला आहे. दरम्यान सामाजिक कार्यकर्ते व पत्रकारांनी हा विषय धरून यांनी यासंदर्भात नुकतीच हिंगणा तहसीलदार यांच्याशी बातचीत करून यांच्याकडे तक्रार केली असता तहसीलदारांनी तक्रारीची दखल घेत प्रशासकीय चौकशीचे आदेश दिले आहे. या संकुलावर 2014 पासून आवश्यक सुविधायित उपलब्ध नाहीत बोरवेलचे पाणी असून सुद्धा पिण्याचा पाण्याचा अभाव शौचालय साठी निधी मिळूनही बांधकाम थंड बसत्यात असल्याने खेळाचे संकुल निवड शोभेची वास्तू ठरत आहे.
प्रतिक्रिया:तालुका क्रीडा अधिकारी प्रभारी अनिल बोरवार यांच्याशी फोनद्वारे संपर्क केला असता ते म्हणाले तुम्ही येऊन बघा काय काम चालू आहेत काय नाही तुम्ही फोनवर प्रश्न विचारू नका असे ते म्हणाले.
मिळालेल्या माहितीनुसार यांनी माहिती अधिकार अंतर्गत माहिती घेतल्यावर एका बाहेरच्या जो नागपूर किंवा हिंगण्याला राहत नाही त्या क्रीडा मार्गदर्शक याचे नाव व त्याच्या नावावर धनादेश देण्यात करण्यात आला आहे. व अद्याप पर्यंतही क्रिडा मार्गदर्शकाची नियुक्ती करण्यात आलेली नाही अशी धक्कादायक माहिती समोर येत आहे. व ज्या क्रीडा मार्गदर्शकाचे नाव टाकले आहे त्यांच्या नावावर काही वर्षापासून धनादेशाने पैसे देण्यात आले आहे. पूर्णा तालुका क्रीडा संकुल समितीचे चौकशीचे आदेश माननीय जिल्हाधिकारी नागपूर यांनी दि. 28 फेब्रुवारी 2022 जिल्हाधिकारी यांनी चौकशी करण्याकरता पत्र नागपूरचे उपसंचालक यांच्याकडे पाठवले असता, अद्यापही आज चार वर्ष होत असतानाही चौकशीचा अहवाल त्यांनी आतापर्यंत दिलेला नाही.