🔥थंडीच्या गारठ्यात मिळाली मायेची ऊब श्यामसुंदर राठी.
धानोरा -/ दिवाळीनंतर जाणवणारी थंडी आता बरीच वाढलेली आहे, बंद घरातही या थंडीचा गारठा जाणवतो, मात्र ज्यांना आपल्या रोजच्या उदरनिर्वाहाची चिंता असते असे अनेक जीव जे रस्त्याच्या कडेला, फुटपाथावर, दुकानाच्या आडोशाने, मंदिर परिसरात झोपलेले असतात. त्यांचा विचारही अंगावर काटा आणतो, पण फक्त विचार न करता या परिस्थितीवर मात करणारे व समाजभान जपणारे आवश्यक ठरते.
गेल्या अनेक वर्षपासुन आमच्याकडून ब्लॅकेट वाटपाचा एक स्तुत्य उपक्रम राबविला जातो. या कडाक्याच्या थंडीत ब्लॅकेटच्या रुपात मायेची उब देवून थंडीने गारठलेल्यांच्या चेहयावर हास्य फुलविणारी ठरते, अशी भावना आर्वी येथील ज्येष्ठ समाजसेवी शामसुंदर राठी
यांनी व्यक्त केली.
ते 1 डिसेंबर रोजी धानोरा येथे पत्रकार संरक्षण समिती वर्धा जिल्हा, आल इंडिया शास्त्री साेशल फाेरम, एन.एन.सी.सी. युनिट देवळी व श्यामसुंदर राठी मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ब्लॅकेट वितरण सोहळ्याप्रसंगी उद्घाटक म्हणून बोलत हाेते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच रेखाताई कावडे तर प्रमुख अथिती म्हणून ज्येष्ठ समाजसेवी पंकज चांडक, हरीभाऊ मांदाडे, राजु लभाणे, विलास कुळकर्णी, श्रीकांत वाघ, गिरीश राठी, नरेश कुमरे, पत्रकार संरक्षण समितीचे अध्यक्ष शशांक चतारे, एन.सी. सी.अधिकारी कॅप्टन मोहन गुजरकर, ऑल इंडिया शास्त्री सोशल फोरमचे राष्ट्रीय उपाध्यक्ष इमरान राही, राष्ट्रीय सचिव किरण फुलझेले, उपविभागीय अभियंता विजय नाखले, पत्रकार अनिल गावंडे, संताेष देशमुख, अब्दुल गनी मंचावर प्रामुख्याने उपसि्थत हाेते.
कॅप्टन मोहन गुजरकर म्हणाले की कोणतही संकट आले की माणसं जवळ येतात. अनेक बंधने व मर्यादा पाळाव्या लागत असल्या तरी आपल्यातली माणूसकी मात्र आपण जिवंत ठेवली पाहिजे. अशा गरजू लोकांप्रती सामाजिक सहिष्णूता जागवन ही आज काळाची गरज झाली आहे. या भावनेतून गरजुंना दिलासा देण्याचा एक उत्तम उपक्रम घडवून आणला ही कौतूकस्पद बाब असल्याचे इमरान राही यांनी नमुद केले.
शशांक चतारे यांनी कार्यक्रम आयोजित करणा-या संस्थेचे मनापासून अभिनंदन केले. यावेळी पंकज चांडक, हरिभाऊ मादांडे, श्रीकांत वाघ,रेखाताई कावडे यांनी सुध्दा आपले मनोगत व्यक्त केले.
‘कार्यक्रमाची प्रस्तावना विलास कुळकणी,
संचालन गणेश चौधरी, तर आभार शशांक चतारे यांनी मानले.पाहुण्यांच्या हस्ते शंभर ब्लँकेट गर्जुंना वितरण करणात आले.
कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता राजेश धोपटे, नामदेव अखाडे, श्रीकांत पवार, प्रशांत आजनकर, गिरधर वसाके, दशरत फाले भगवान वनकर, संतोष देशमुख वामन चतारे, धिरज वाटगुळे,दशरथ फाले आदी अनेकांनी अथक परिश्रम घेतले.