नगरपंचायत निवडणूकीचा रणसंग्राम; १३ प्रभागासाठी ६५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात

0

प्रतिनिधी/सेलू

सेलू येथील नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकीकरीता आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी ६ उमेदवारांनी आपला अर्ज मागे घेतल्याने आता १३ प्रभागांसाठी ६५ उमेदवार निवडणुकीच्या मैदानात आहेत. याकरिता मंगळवार दि. २१ डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर निवडणूक आयोगाने ओबीसींसाठी राखीव जागा वगळून १३ प्रभागासाठी निवडणूक प्रक्रिया राबविली आहे. या १३ प्रभागासाठी राजकीय पक्षासह अपक्ष अशा एकूण ७१ उमेदवारांनी आपले नामांकन अर्ज दाखल केले होते. यात प्रामुख्याने साहसिक जनशक्ती संघटना, सेलू सुधार विकास आघाडी, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा, बसपा, वंचित बहुजन आघाडी तसेच अपक्ष उमेदवार यांचा समावेश आहे. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी ६ उमेदवारांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतल्याने आता १३ जागांसाठी ६५ उमेदवार निवडणुकीच्या मैदानात आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेतलेल्या उमेदवारांत वरुण जैनेंद्र दफ्तरी, पद्मा अरुण कोंबे, पुष्पा मनोज सिंदीकर, ममता चंद्रकांत उईके, नरेंद्र उदेभान उईके, सविता राजू भगत यांचा समावेश आहे. मंगळवारी दुपारी बारा वाजता चिन्ह वाटप प्रक्रिया पार पडणार असून त्यानंतरच प्रचाराची खरी रणधुमाळी सुरू होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!