🔥नव्याने बांधलेल्या सिमेंट रस्ता व सिमेंट नाल्या बांधलेल्या कामावर पाणी मारत नसल्याने बोटोणा ग्रामवासी आक्रमक.
🔥सामाजिक कार्यकर्ता समीर भांगे यांनी दिला चक्का जाम करण्याचा ईशारा.
आष्टी शहीद -/ आष्टी ते कारंजा (घा.)या मार्गांवर सध्या रात्र पाळीत सिमेंट रस्त्याचे बांधकाम सुरु आहे. तर बोटोणा गावाजवळ दोन्ही बाजूने नालीचे बांधकाम सुरु आहे. नव्याने बांधकाम केलेल्या सिमेंट रस्त्यावर तसेंच नालीवर पाणी टाकत नसल्याने होणारे काम निकुस्ट दर्जाचे होत असल्याची ग्रामस्याची ओरड आहे. पहिले पाणी टाका नंतर कामाला सुरवात करा असा पवित्रा बोटोणा येथील ग्रामस्यांनी घेतल्याने कंत्राट दाराची यंत्रणा काही काळ बेपत्ता झाली होती.
सविस्तर असे कि,
आष्टी ते कारंजा (घा.)या मार्गांवर बोटोणा गावाजवळ सिमेंट रस्ता व नालीचे नवीन बांधकाम सुरु आहे. नवीन बांधकामं केल्यावर त्यावर पाणी टाकल्या जात नाही म्हणून रस्त्यावर तडा जात आहे असा गंभीर आरोप बोटोणा येथील ग्रामस्यांनी केला आहे. गेल्या महिना भरापासून गावाजवळ नालीचे बांधकाम सुरु असून त्यावर एकदाही पाणी टाकले नाही. सिमेंट च्या कामावर पाणी टाकले जात नसेल तर ते केलेले बांधकाम किती दिवस तग धरणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे. सिमेंट रस्त्यावर आतापासून तडा जात असेल तर एक दोन वर्षात या मार्गाची काय अवस्था होईल हे न सांगितलेले बरे असे म्हणण्याची वेळ गावाकऱ्यावर आली आहे. सिमेंट च्या नाल्या बांधकाम केल्यावर त्यावर पहिल्ले पाणी टाका म्हणून बोटोणा येथील सामाजिक कार्यकर्ते समीर भांगे यांनी कंत्राट दाराच्या दिवणजीला फोनवरून माहिती दिली. परंतु मुजोर दिवाणजी हा उलट चौकशी करायला लागला. समीर भांगे यांनी सडेतोड उत्तर देताना कंत्राट दाराला माहिती देऊन पाहिले बांधकाम केलेलेल्या ठिकाणी पाणी टाका पाणी टाकत नसणार तर चक्का जाम आंदोलन करू असा असा सज्जड इशारा यावेळी दिला. समीर भांगे यांना पाठिंबा देण्यासाठी बोरखेडी, बोटोणा, पार्डी येथील नागरिकांनी पाठिंबा व समर्थन देणार असे म्हटले आहे. निकुस्ट दर्जाचे काम होताना नागरिक आंदोलन करण्यासाठी तयार असताना शासकीय सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी नेमके करतात तरी काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.