आर्वी -/तालुक्यातील नांदपूर-टाकरखेड व आर्वी-शिरपूर-टाकरखेड रस्त्यांची अवस्था अतिशय वाईट आहे. केव्हाही कुठलीही अप्रिय घटना घडू शकते. त्यामुळे दोन्ही रस्त्यांचं बांधकाम तात्काळ सुरू करण्याकरिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आवश्यक ते निर्देश संबंधितांना द्यावे. अशा आशयाचे निवेदन आर्वी तालुक्यातील ग्राम नांदपूर येथील अरविंद लिल्लोरे यांनी उपविभागीय अधिकारी आर्वी यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आज दिनांक फेब्रुवारी 7 ला दिले.या संदर्भात, एप्रिल 3, 2025 ला, श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक, आर्वी येथे ‘उपोषण’ करण्याचे ठरले आहे. परंतु ‘उपोषण’ करण्याची आवश्यकता पडणार नाही, याची खात्री देखील त्यांनी व्यक्त केली आहे.श्री क्षेत्र टाकरखेड व शिरपूर येथे जाणार्या येणार्या लोकांना किती त्रास सहन करावा लागत असेल, हे त्या लोकांनाच माहिती आहे. गावापर्यंत एक खड्डे मुक्त रस्ता, ही एक मुलभुत गरज आहे. सरकार हे अजूनही पुर्ण करु शकले नाही, हे गावामध्ये राहणार्या लोकांचे दुर्भाग्य आहे. सरकार स्मार्ट सिटी बनविण्याच्या मागे लागले आहेत. पण गावे कधी स्मार्ट होणार? अशा प्रकारच्या भावना अरविंद लिल्लोरे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केल्या.