नागझरीतील पशुवैद्यकीय दवाखान्यातच शिपायानेच केली गळफास घेऊन आत्महत्या
प्रतिनिधी:-सागर झोरे
देवळी येथील किरायाने रहिवासी असलेल्या तरुणाने अज्ञात कारणाने नागझरी येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात आत्महत्या केली आत्महत्या मागचे कारण अजूनही अज्ञात आहे.या युवकाचे नाव किसन शाम ढगे वय 30 असे असून तो नागझरी येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात शिपाई म्हणून कार्यरत होता त्याचबरोबर तो स्पर्धा परीक्षांचा अभ्यासही करीत होता मात्र त्याला त्यात बरेच अपयश आले होते असे त्यांचे सहकारी कर्मचारी त्यांचे म्हणणे आहेत.कदाचित अपयश आल्याने तर आत्महत्या केली असावी असा अंदाज बांधला जात आहे. किसन ढगे हा मूळचा भोगाव तालुका पालम जिल्हा परभणी येथील रहिवासी होता या आधी तो भिडी येथे कार्यरत होता.त्यानंतर 22 जून 2019 ला नागझरी येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात शिपाई म्हणून काम करीत होता मात्र दि.8 एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास 11 वाजून 45 मिनिटाच्या दरम्यान पशुवैद्यकीय दवाखान्याच्या स्टोर रूम मधील पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली आहे.यामागील कारण अद्यापही अज्ञात आहे तसेच या घटनेची माहिती पुलगाव पोलीस यांना मिळाली त्यावेळी पुलगाव पोलिस स्टेशनचे परचाके व त्यांचे शिपाई यांनी या घटनेचा प्रार्थमिक पंचनामा केला असता मृतक किसन ढगे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पुलगाव येथील सरकारी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले. घटनेचा पुढील तपास पुलगाव पोलिस करीत आहे.