नागझरीत पशुवैद्यकीय दवाखान्यातील शिपायाने केलेल्या आत्महत्येचे धक्कादायक कारण आले समोर
देवळी/ सागर झोरे :
देवळी तालुक्यातील तरुणाने काल दि. 08एप्रिल ला नागझरी येथील पशुवैद्यकीय दवाखान्यातील शिपाई किशन ढगे वय- 30 या तरुणाने आत्महत्या केली होती.मात्र त्यामागचे कारण अज्ञात होते. परंतु पोलीस तपासात तरुणाने लिहिलेले सुसाईड नोट मिळाले आणी त्याचबरोबर या आत्महत्या मागचे कारणही उलगडून आले.
पोलीस तपासात किशनने लिहलेले सुसाईड नोट मिळाले. त्यात लिहल्याप्रमाणे किशन हा गेल्या 7-8 वर्षांपासून सतत स्पर्धापरीक्षांचा सातत्याने अभ्यास करतोय. त्याचबरोबर त्याने MPSC अंतर्गत येणाऱ्या PSI mains 2013, STI mains 2014, PSI mains 2016, PSI mains 2017 या परीक्षा दिल्या. एवढेच नव्हे तर त्याने PSI साठी होणारी मुलाखत (interview) पण दिला. त्यात किशनला यश आले नाही. मात्र अपयशाने खचून न जाता त्याने पुन्हा जोमाने अभ्यास केला. व PSI mains 2018, STI 2018 परीक्षा दिली. त्यातही किशनला यश आले नाही. आता मात्र किशन खचून गेला. यातूनच त्याला नैराश्य आले.
घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने कर्जबाजारी होऊन शिक्षण घेणेही आता त्याला शक्य नव्हते. कारण आधीच त्याने शिक्षणासाठी खूप कर्ज घेतले होते.घरची होती नव्हती ती थोडीफार शेतीही विकली गेली होती. त्याचबरोबर zp बँकेचे असणारे कर्ज ही एकूणच सर्व परिस्थितीने किशनला नैराश्य आले होते. PSI होण्याचे मोठे स्वप्न पाहणारा किशन केवळ पैशाअभावी पासुवैद्यकीय दवाखान्यात शिपाई पदावर काम करून तूटपुंज्या पगारात आपले आयुष्य जगत होता.सर्व परिस्थितीशी झुंज देऊन आता किशन थकला होता. परिस्थितीपुढे हतबल झाला. आणि किशनने आपली जीवन यात्रा संपविली. एकूणच घरची हलाखिची परिस्थिती व सतत येणारे अपयश हे किशनसाठी जीवघेणे ठरले. शेवटी किशन सारख्या होतकरू, अभ्यासू, तरुणाचा असा निराशाजनक अंत झाला.