बँक कर्मचार्यांच्या हलगर्जी पणामुळे नागरिकांचे खाते बंद.
नागरीकांचे बँक व्यवस्थापक यांच्यासह लोकप्रतीनिधींना निवेदन.
आष्टी शहीद /येथून नजीकच असलेल्या अंतोरा येथील बॅंक ऑफ इंडिया मध्ये नागरीकांचे बॅंक खाते केवायसी नसल्याने बंद पडत चालले आहे.मात्र बॅंक कर्मचारी खातेदारांची केवायसी करायला बॅंकेत गेले कि टाळाटाळ करीत असल्याने अंतोरा येथील सर्व बॅंक खातेदारांनी एकत्र येऊन बंद पडलेले खाते तातडीने सुरू करण्यासाठी बॅंक व्यवस्थापक आणि लोक प्रतीनिधींना नुकतेच निवेदन दिले आहे. अंतोरा हे गाव राजकीय दृष्ट्या नामांकित आहे. या गावात बँक ऑफ इंडिया ही बँक आहे. या बँक मध्ये जवळील 10 ते 12 गावातील खातेधारक आहे. जास्तीत जास्त लोकांचे बँक खाते KYC मुळे बंद पडले आहे. याबाबत वारंवार येथील बँक मॅनेजर श्री सोळंके यांच्या सोबत चर्चा केली असता. नेटवर्क नाही लिंक नाही असे कारणे सांगून नागरिकांची समजूत घालत आहे. यावर अद्यापही तोडगा किंवा कोणताही निर्णय लागलेला नाही. करिता आज अंतोरा येथील असंख्य युवकांनी येथील बँक मॅनेजर ला आपल्या समस्यांचे लेखी निवेदन दिले व कर्मचारी गाव बंदी करण्याचा इशारा दिला.