नाली बांधकामामध्ये निकृष्ट दर्जाच्या साहित्याचा वापर….

0

🔥इस्टिमेट नुसार काम झाले नसल्याचा आरोप.🔥आचार्य ते डाखोरे कॉन्क्रीट नालीचे प्रकरण.

देवळी -/ येथील प्रभाग क्रमांक ४ मध्ये आचार्य ते डाखोरे यांच्या घरापर्यंत शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेच्या विशेष निधीतून अनुदान सन २०२२-२३ अंतर्गत कॉंक्रीट नालीचे बांधकाम होत आहे. या नालीवर ७ लाख ५१ हजारा रु खर्च होणार आहे. या नालीची लांबी ६० मीटर आहे.परंतु या नालीचे बांधकाम इस्टिमेट नुसार होत नसल्याची ओरड या भागातील नागरिक करीत आहे या नाली बांधकामामध्ये पहिले बेड कॉंक्रीट करून त्याच्यावर नाली बांधण्यास सुरुवात पाहिजे होती परंतु ठेकेदाराने आपल्या मर्जीनुसार गिट्टी बोल्डर टाकून त्याच्यावरच नाली बांधकामाची सुरुवात केलेली आहे. आणि त्या बांधकामामध्ये निकृष्ट दर्जाचा साहित्याचा वापर होत आहे.असे त्या भागातील नागरिकांचे म्हणणे आहे. याविषयी देवळी नगर परिषदेतील बांधकाम अभियंता संदीप डोईजड यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून माहिती विचारली असता माझ्याकडे तीन नगरपरिषदेचे अतिरिक्त कारभार आहे त्यामुळे मी जातीने लक्ष देऊ शकत नाही.मागील आठ दहा महिन्यापासून देवळी नगर परिषद मध्ये स्थायी मुख्य अधिकारी,नगर अभियंता, बांधकाम अभियंता यांचे पदे रिक्त आहे या पदांचा अतिरिक्त कारभार इतर अधिकाऱ्यांकडे देण्यात आलेले आहे.त्यामुळे देवळी नगरपरिषद होत असलेल्या बांधकामाकडे या अधिकाऱ्यांना लक्ष देण्याकरिता वेळ नसल्यामुळे ठेकेदार आपल्या मन मर्जीने कारभार करीत आहे त्यामुळे कामाची गुणवत्ता खालवली आहे. देवळी नगर परिषद क्षेत्रामध्ये होत असलेल्या बांधकामावर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन ते इस्टिमेट नुसार करून घ्यावे अशी मागणी देवळीकर जनता करीत आहे.    🔥नाली बांधकामाविषयी संबंधित अभियंताला विचारणा केली असता माझ्याकडे तीन नगरपरिषदेचा चार्ज आहे. त्यामुळे प्रत्यक्षामध्ये कामावर लक्ष देता येत नाही पण याकरिता एक कर्मचारी नियुक्त केला असून त्यांनी या कामावर लक्ष ठेवायचे आहे. याविषयी मी त्याला विचारून पुढील कारवाई करेल.(बांधकाम अभियंता नगरपरिषद संदीप डोईजड देवळी)(क्रमशः)

सागर झोरे साहसिक news-24 देवळी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!