नाली बांधकाम तात्काळ सुरू न झाल्यास वसंतराव ढवळे व अशोक बुटले यांचा उपोषणाचा इशारा.
आष्टी शहीद / नगरपंचायत अंतर्गत येत असलेल्या वार्ड क्रमांक चार मधील विठ्ठल मंदिर ते अशोक शिरभाते यांच्या यांच्या घरापर्यंत असलेल्या खस्त झालेल्या नालीतील दुर्गंध युक्त दूषित पाणी घरी असलेल्या विहिरीत जात असल्याने विहिरीतील पाणी दूषित होत असल्याने आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.
सविस्तर वृत्त असे की गेल्यावर अनेक वर्ष आधी ग्रामपंचायत असताना बांधण्यात आलेल्या नालीचे खस्त हाल झाले असून या नालीतील खाली असलेला सिमेंट काँग्रॅटीकरण पूर्णतः निघाले असल्याने नालीत वाहत असलेले दूषित पाणी नालीच्या कडेला लागून असलेल्या घरांमध्ये असलेल्या विहिरीत मुरत असल्याने या विहिरीतील पाणी दूषित होत आहे. या संदर्भात आष्टी नगरपंचायत ला वार्ड नंबर चार मधील रहिवाशी वसंतराव ढवळे, अशोक बुटले यांनी गेल्या चार ते पाच वर्षापासून वारंवार निवेदनाद्वारे माहिती देत पत्रव्यवहार केला मात्र नगरपंचायत आष्टी कडून यावर कोणताही दुजोरा किंवा पाहणी करून दुरुस्ती करून देण्यात आली नाही. गेल्या साडेसात वर्षापासून या नगरपंचायत वर काँग्रेसची एक हाती सत्ता असून सुद्धा जनतेला न्याय मिळत नसल्याने खंत व्यक्त केल्या जात आहे. पाच वर्षापासून या खस्त झालेल्या नाली बाबत वारंवार नगरपंचायत ला माहिती देऊन सुद्धा याकडे आष्टी नगरपंचायत दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. या नालीतील वाहणारे दूषित पाणी अशोक बुटले व वसंता ढवळे यांच्या घरातील विहिरीत मुरत असल्याने या विहिरीतील पाणी दूषित झाले आहे. सदर विहिरीचे पाणी पिण्यास योग्य नसल्याचे आरोग्य विभाग यांनी पत्र सुद्धा दिले आहे तरीही नगरपंचायत आष्टीला जाग येत नसल्याने निवेदन करते वसंत ढवळे व अशोक बुटले यांनी म्हटले आहे की या नालीचे बांधकाम त्वरित करण्यात यावे अन्यथा नगरपंचायत आष्टी समोर उपोषणाला बसण्याचे इशारा दिला आहे. यासंदर्भात आष्टी नगर अध्यक्ष अनिल धोत्रे, आमदार दादाराव केचे, माजी आमदार अमर काळे, नगरपंचायत सी ई ओ यांना निवेदन देण्यात आले आहे. शासनाकडून निधी येत नसल्याने अनेक विकास कामे रखडले आहे . सदर नाली बांधकाम मंजूर असून या नालीच्या बांधकामाक आमदार निधीतून होणार असल्याचे त्यांनी सांगितले.अनिल धोत्रे नगराध्यक्ष आष्टीनाली बांधयाकामाकरिता आमदार दादाराव केचे यांच्या निधीतून सात लाख रुपयांचा निधी टाकण्यात आला असून सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत बांधकाम करण्यात येणार आहे. नगरपंचायत आष्टी कडून याबाबत ना हरकत प्रमाणपत्र देण्यात आले आहेसचिन सुबनवार सहाय्यक मुख्य अधिकारी